• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, June 8, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

आमदार कैलास पाटील उपोषणाला वाढता पाठिंबा : शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक

शेतीमित्र by शेतीमित्र
October 29, 2022
in शेतीच्या बातम्या
0
आमदार कैलास पाटील उपोषणाला वाढता पाठिंबा : शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक
0
SHARES
0
VIEWS

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा दोन वर्षांपूर्वीचा रखडलेला पीक विमा द्यावा व ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज शनिवारी सहावा दिवस आहे. मात्र अद्याप कोणता तोडगा निघाला नसल्यामुळे आता शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या आंदोलनास शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्ष संघटना यांचा मोठा पाठिंबा मिळत असून, काही शिवसैनिकांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले. तर, दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी पाण्यात उतरुन पीक विमा नुकसान भरपाईची मागणी केली.

ब्रेकिंग : ऊस दर संघर्ष समितीच्या आंदोलनाला पंढरपुरात हिंसक वळण

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत आपण माघार घेणार नाही, असा पवित्रा आमदार कैलास पाटील यांनी घेतला आहे. आमदार पाटील यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. दररोज त्यांना पाठिंबा वाढत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांची प्रकृती खालावत चालल्याने सरकारने आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे सुरु असलेल्या उपोषणाला कोणत्याही क्षणी हिंसक वळण लागण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

जिल्ह्यात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय सततच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांनाही विविध रोगाने ग्रासले आहे. या परिस्थितीत शेतकरी अडचणीत आला असून, दोन वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा आणि नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2020 मधील पीकविम्याची 531 कोटी रुपये जिल्ह्यातील तीन लाख 57 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन आठवड्यात जमा करण्याचे बंधन होते, असे असतानाही अद्यापपर्यंत पीकविमा जमा झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावत फक्त न्यायालयात जमा केलेल्या 200  कोटीवर प्रशासन बोळवण करत असल्याचे दिसून येत आहे, हा पीक विमा जमा होत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा पवित्रा आमदार पाटील यांनी घेतला आहे.

मोठी बातमी : गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागू : कृषीमंत्री सत्तार

आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. आमदार पाटील यांची तब्बेत खालावली असून, त्यांना पाठिंबा म्हणून पाडोळी या गावातील जवळपास 25 शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. शेतकऱ्यांनी तलावात उड्या घेतल्या आहेत. दिवसेंदिवस हे आंदोलन अधिक आक्रमक होताना दिसत आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी उस्मानाबाद येथील शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकानी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून घोषणाबाजी केली. जो पर्यंत शासन निर्णय घेत नाही तो पर्यंत इमारतीच्या खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता.

दरम्यान, जोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी धुळे सोलापूर हायवे वर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच औरंगाबाद-सोलापूर महामार्ग देखील रोखला आहे. टायर जाळून यावेळी निषेध करण्यात आला.

मोठी बातमी : किसान सभेचा ‘ओला दुष्काळ’ प्रश्नी आता निर्णायक संघर्ष

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला पीक विमा कंपनीला नोटीस पाठवण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी कार्यवाही केली आहे.

खरीप 2020 साठी पीक विमा कंपनी यांना वारंवार सूचना देऊनही कंपनीने 574 कोटी रुपये निधी जमा केलेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. खरीप 2021 साठी 374 कोटी रुपये कंपनीला वारंवार सूचना देऊन देखील जमा केलेले नाहीत. त्यासंदर्भात देखील सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार येत्या काही दिवसात जिल्हा प्रशासनाकडे 200 कोटी रुपयाचा निधी जमा होण्याची शक्यता आहे. तो निधी पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्राच्या समप्रमाणात तत्काळ वाटप करण्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांना सूचित केले आहे.

पीकविमा, शेतकरी अनुदान आणि ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण आता गावोगावी पसरत चालले आहे. कैलास पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उस्मानाबाद शहर शिवसेना शाखेकडून शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तर, जिल्हाधिकारी यांनी 29 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर पर्यंत जिल्हात जमावबंदी व शस्त्रबंदीचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाची बातमी : गुलाबी बोंडअळीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ फायद्याचा ठरणार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: 29 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर पर्यंत जिल्हात जमावबंदीDemonstration in the district from October 29 to November 13There is fear that the hunger strike could turn violent at any momentThere is no withdrawal until the money is deposited in the farmer's accountWater burial movement of 25 farmers in Padoli villageउपोषणाला कोणत्याही क्षणी हिंसक वळण लागण्याची भीतीपाडोळी गावात 25 शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलनशेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत माघार नाही
Previous Post

ऊस दर संघर्ष समितीच्या आंदोलनाला पंढरपुरात हिंसक वळण

Next Post

जनशक्ती शेतकरी संघटनेचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
जनशक्ती शेतकरी संघटनेचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

जनशक्ती शेतकरी संघटनेचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230561
Users Today : 17
Users Last 30 days : 1259
Users This Month : 160
Users This Year : 4891
Total Users : 230561
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us