कापसाची मोबाइल जिनिंग प्रक्रिया सुविधा शेतकऱ्यांच्या थेट बांधावर निर्माण झाली तर ? नक्कीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अनेक दिवसाची प्रतिक्षा फळाला आली असेच म्हणता येईल. लवकरच ही सुविधा बांधावर येण्याची वेळ आली आहे. कारण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी यासाठी पुढाकार घेताल असून, आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधारच प्रक्रिया करून सरकी आणि रूई वेगळी करता येणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून कापूस वेचणी यंत्राची केवळ चर्चाच होत होती. मात्र आता कापसाच्या मुल्यवर्धनाची सोय थेट शेतकऱ्यांच्या बांधावरच उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच या संयंत्राची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे.
कापसाचे दर हे त्यातील रूईच्या टक्केवारीवर ठरवले जातात. भारतात ढोबळमानाने 32 ते 34 टक्के रूईचे प्रमाण ग्राह्य धरून कापसाला दर दिला जातो. लवकरच रूईची 40 टक्केवारी असलेला वाण बाजारात येणार आहेत. त्यामुळे रुईच्या टक्केवारीवर दर मिळावा अशी मागणी होत आहे. यापूर्वी केंद्रीय कापूस अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (सिरकॉट) निनी जिनिंगचा पर्याय विकसित केला होता. त्यातून काही अंशी दिलासा मिळाला असला तरी त्यातून पूर्णता समाधान झालेले नाही. मात्र या नव्या संयंत्रणेमुळे कापूस उत्पादकांना मोठा फायदा आणि दिलासा मिळणार आहे. विशेषत: राहुरी कृषी विद्यापीठाने त्यासाठी पुढाकार घेतल्याने कापूस उत्पादकांमध्ये या संयंत्राविषयी अधिकच उत्सुकता लागून राहिली आहे.
काय म्हणाले यासंदर्भात कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील ?
कापसाचे मूल्यवर्धन थेट बांधावरच होणे गरजेचे आहे. त्याकरिता मोबाईल जिनिंग ही संल्पना मांडत त्यावर आमच्या राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काम केले आहे. डिझाईन आणि संयंत्रही तयार केल आहे. आवश्यक चाचण्या झाल्यानंतर हे संयंत्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाईल. हे संयंत्र ट्रॅक्टरचलित असल्याने याची किंमत आवाक्यात राणार आहे. शेतकऱ्यांना थेट शेतावरच कापसावर प्रक्रिया करता येणार आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
माती परिक्षण करताना ही काळजी नक्की घ्या !
द्राक्ष खरेदीतून होणारी फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
काय आहे नव्या कृषी निर्यात धोरणात ?
डॉ. वाय. जी. प्रसाद (नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक)
कापसून उत्पादक अशिया भागात कच्चा कापूस विकला जातो. रुई आणि सरकी वेगळी करून विकल्या जात नाही. परंतु नजीकच्या काळात रूई वेगळी करून विकल्या गेल्यास कापूस उत्पादक शेतकर्यांना चांगला परतावा मिळणार आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने नुताच 43 टक्के रुई असलेल्या वाण निवड पद्धतीने विकसित केला आहे. रूई नुसार दर घेण्यासाठी जिनिंगची सुविधा उपलब्ध असली पाहिजे. मोबाइल जिनिंगचा विचार करताना, त्यातून मिळणाऱ्या रूईची गुणवत्ता, रूई खराबा होण्याचे प्रमाण, फायबर क्वालिटी या सर्व घटकांबाबतची पडताळणी होणे गरजेचे आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇