येत्या दोन दिवसाता महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला असून, यंदा उन्हाळा अतिशय कडक असल्याने यंदा मान्सून वेळेआधी म्हणजेच २ जूनच्या आसपास दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
येत्या दोन दिवसात पुण्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस येणार आहे. त्यामुळे या भागात दोन दिवस हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पावसाबरोबरच राज्यातील तापमानाचा पाराही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसापासून अंदमान समुद्राच्या उत्तर भागात आणि म्यनमारच्या किनारपट्टी दरम्यान चक्रीय वार्याची स्थिती सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मिटर उंचीवर आहे. तर तेलंगणा ते तामिळनाडूच्या उत्तर-दक्षिण दरम्यान कमी दाबाचा पट्टा होत असून तामिळनाडूचञया उत्तर भागारत चक्रीय वार्यांची स्थिती तयार होत आहे. त्यामुळे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान नागपूर वेधशाळेने विदर्भात ९ ते ११ एप्रिल दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज विर्तवला आहे. गेल्या तीन-चार दिवसापासून विदर्भात काही प्रमाणात उष्णतेची लाट आहे. मंगळवारी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. त्यामुळे या पावसामुळे वाढलेल्या तापमानापासून थोडा दिलासा मिळणार आहे.
तज्ज्ञांच्या मते यंदा उन्हाळा लवकर सुरू झाल आहे. मार्च महिन्यातच बहुतांश शहरांचे तापमान ३५ ते ३८ अंशावर गेले. यंदाचा मार्च महिना गेल्या अनेक वर्षात तिसर्यांदा सर्वाधिक उष्णतेचा ठरला आहे. तर एप्रिल महिन्यात पार्याने चाळीची गाठली आहे. अशा अनेक कारणांमुळे यंदा मान्सून पूर्व पाऊस दमदार पडण्याची शक्यता असून, तो एप्रिल महिन्याच्या माध्यावर व मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पश्चिम बंगाल, कर्नाटक, सिक्कीम, अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, मेघालय, असाम या राज्यात येत्या २४ तासात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. झारखंडमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता आहे.