अरबी समुद्राच्या बाजूने गेल्या दहा दिवसांपासून थांबलेला मान्सून पावसाचा प्रवास सुरु झाला असून, अखेर तो महाराष्ट्रात मोठ्या वेगाने दाखल झाला आहे. त्याने तळकोकणातून महाराष्ट्रात प्रवेशही केला आहे. काल मान्सूनच्या पावसाने मुंबई, डहाणू, पुण्यासह बहुतांश कोकण किनारपट्टी व दक्षिण मध्य महाराष्ट्रात हजेरी लावली असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
लक्षवेधी बातमी : पीकविम्याबाबतची कॉर्पोरेटधार्जिनी नीती सरकारने बदलावी : पी. साईनाथ
यंदा मान्सून केरळमध्ये नियमित वेळेच्या तीन दिवस आधीच (29 मे ) पोहचला आहे. त्यानंतर दोनच दिवसांत संपूर्ण केरळ राज्य, कर्नाटक किनारपट्टीसह गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मान्सूनने मजल मारली. त्यानंतर प्रवाह मंदावल्याने मान्सून तब्बल 10 दिवस रेंगाळला होता. शुक्रवारी महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावरील वेंगुर्ल्यापर्यंत मान्सून दाखल झाला होता. शनिवारी मुंबई, ठाणे, डहाणू, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या काही भागासह कर्नाटकच्या गदगपर्यंतच्या भागात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे.

आनंदाची बातमी : केंद्राकडून 17 पिकांच्या हमीभावात मोठी वाढ
वाटचालीस पोषक हवामान असल्याने सोमवारपर्यंत मॉन्सून संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्राचा बहुतांशी भाग, संपूर्ण कर्नाटक, तामिळनाडूसह तेलंगणा, आंध्रप्रदेशच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर बुधवारपर्यंत मराठवाड्याच्या काही भागासह, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराचा बहुतांशी भाग, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहारच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.
मोठी बातमी : कृषी दिनापासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान : अजित पवार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1