संपूर्ण देशासाठी वरदान ठरलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे म्हणजेच मान्सूनचे यंदा पाच दिवस आधीच २७ मे रोजी देवभुमी केरळमध्ये दाखल होणार आहे. हवामान विभागाने ही शक्यता वर्तविली असून, या अंदाजात ४ दिवसांची तफावत गृहीत धरण्यात आली आहे.
2017 मध्ये हवामान विभागाने 30 मेचा मान्सूनचा अंदाज व्यक्त केला होता व 30 मे रोजी मान्सून दाखल झाला होता. 2018 मध्ये हवामान विभागाने 29 मेचा मान्सूनचा अंदाज व्यक्त केला होता व 29 मे रोजी मान्सून दाखल झाला होता. 2019 मध्ये हवामान विभागाने 6 जूनचा मान्सूनचा अंदाज व्यक्त केला होता व 8 जूनचा मान्सून दाखल झाला होता. 2020 मध्ये हवामान विभागाने 5 जूनचा मान्सूनचा अंदाज व्यक्त केला होता व 1 जूनचा मान्सून दाखल झाला होता. तर गेल्यावर्षी 2021 मध्ये हवामान विभागाने 31 मेचा जूनचा मान्सूनचा अंदाज व्यक्त केला होता व 3 जूनचा मान्सून दाखल झाला होता.
आनंदाची बातमी : कृषी पर्यटन चालकांचा होणार गौरव !
दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणत: मान्सून साधारणत: 1 जून पर्यंत केरळमध्ये पोचतो. मान्सूनचे आगमन सात दिवस आधी किंव्हा उशीराने होऊ शकते. गतवर्षी मान्सूनचे आगमन तीन दिवस उशीराने झाले होतो. यंदा तो पाच दिवस आधीच केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने सांख्यिकीय मॉडेलच्या आधारे हा अंदाज जाहीर केला आहे. वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण, चीनच्या दक्षिण समुद्रातून होणारा किरणोत्सर्ग, अग्नेय हिंद महासागरात वाहणारे वारे, विषुववृत्तीय हिंद महासागरातील वारे, नैर्ऋत्य प्रशांत महासागरातील किरणोत्सर्ग या घटक हा अंदाज तयार करताना विचारात घेतले जातात.
नक्की वाचा : जालन्याची वाटचाल रेशीम हबच्या दिशेने
यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) 14 एप्रिल रोजी जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. मान्सून हंगामात ला-निना स्थिती राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सून हंगामातील पावसाचा सुधारीत दीर्घकालीन अंदाज व विभागानिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे.
महत्त्वाची बातमी : वातावरणीय बदलांवर उद्यावर नाही आजच कामची गरज : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
बंगालच्या उपसागरात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) आगमनास पोषक हवामान झाले आहे. विषूववृत्ताच्या दक्षिणेकडून वाढलेल्या वाऱ्यांच्या प्रवाह पाहता उद्यापर्यंत (ता.15) दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
लक्षवेधी बातमी : वाढत्या तापमानाचा शेती पिकांवर परिणाम
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1