सुमारे दहा दिवसांपासून प्रतिकूल वातावरणामुळे आगेकूच करू न शकलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या अर्थात मान्सून पावसाच्या प्रवासाला आता अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मोसमी पावसाचा तळकोकणातून महाराष्ट्रात प्रवेश होऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रात बहुतांश भागांत पुढील चार ते पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे.
मोठी बातमी : कृषी दिनापासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान : अजित पवार
मान्सून पावसाने यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आधीच म्हणजे 29 मे रोजी कोरळमधून भारतात प्रवेश केला होता. या काळात अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्य येत असल्याने आठवड्याच्या कालावधीतच महाराष्ट्रात मोसमी पावसाचा प्रवेश होण्याबाबत अंदाज देण्यात आला होता. मात्र, वाऱ्यांचा वेग कमी होऊन मोसमी पावसाच्या प्रवासाचा अडथळा निर्माण झाला. 31 मे रोजी कर्नाटकच्या कारवारपर्यंत आणि गोव्यापासून काही अंतरावर मोसमी पाऊस पोहोचला. त्यानंतर त्याची कोणतीही प्रगती झाली नाही.
आनंदाची बातमी : ऊस नोंदणीसाठी साखर आयुक्तालयाचा नवा ॲप

अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाचा प्रवास गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून थांबलेला आहे. बंगालच्या उपसागराच्या बाजूने 3 जूनला पूर्वोत्तर राज्ये आणि हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पोहोचलेल्या मोसमी पावसाने गेल्या सहा दिवसांपासून कोणतीही प्रगती केलेली नाही. मात्र, सध्या दोन्ही बाजूने त्याच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
आता मात्र मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान झाले आहे. शनिवारपर्यंत मान्सून अरबी समुद्राचा आणखी काही भाग, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भाग, संपूर्ण तमिळनाडू, आंध्रप्रदेशासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत मान्सून संपूर्ण कर्नाटक व्यापून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत पोचण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.
महत्त्वाची बातमी : अण्णा हजारेंच्या नव्या संघटनेची लवकरच घोषणा

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1