देशातील मान्सूनचा प्रवास खोळंबला असून, गेल्या चार दिवसांपासून मान्सून एकाच जागेवर रेंगाळला आहे. राज्यासह देशभरात काही ठिकाणी हलका तर भागांत चांगला पाऊस झाला आहे. राज्यात झालेल्या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या असून आता सर्वदूर जोरदार पावसाची शेतकऱ्यांनी प्रतीक्षा आहे. मात्र सध्या मान्सून पोरबंदर, बडोदा, शिवपुरी, रेवा आणि चुर्क या भागांत कायम आहे.

राज्यात काही भागांत मान्सून सरी बरसत आहेत. मात्र सर्वदूर जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. राज्यातील शेतकरी पावसाकडे डोळे लावून आहेत. मात्र मान्सूनने राज्य व्यापून पाच दिवस झाले तरी संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झालेला नाही. सध्या राज्यात जोरदार पावसाला पोषक वातावरणही निर्मिती झालेले नाही. सोमवारी मान्सूनने मध्य प्रदेश, छत्तीगड, बंगालचा उपसागर, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश व्यापून बिहार आणि उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांतही प्रगती केली होती. मात्र त्यानंतर मान्सूनचा प्रवास थांबला आहे. सध्या पोरबंदर, बडोदा, शिवपुरी, रेवा या भागांत मान्सूनची दिशा कायम आहे.
महत्त्वाचा सल्ला : शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करू नये ; कृषी आयुक्तांचा सल्ला
संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झालेला नाही. मात्र अनेक भागांत पावसाच्या सरी पडत आहेत. बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर उर्वरित राज्यात हलका पाऊस पडला. राज्यात पुढील आठवड्यात मान्सूनचा पाऊस वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1