शेतकऱ्यांना खुश करणारी बातमी समोर आली आहे. सर्वांचे अंदाज चुकवत तीन दिवस आधीच मान्सून अंदामानात दाखल झाला आहे. मागील वर्षी मान्सूनचे 22 मे रोजी अंदामानात आगमन झाले होते. यंदा तो 19 मे रोजी दुपारी 2 च्या सुमारास अंदामानात दाखल झाला असून, तत्पूर्वी चोवीस तास आधी त्या भागात पावसाला सुरुवातही झाली आहे.
पार चढला : राज्यात उष्माघाताचे 12 बळी
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाला आहे. पुढील तीन ते चार दिवसात मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांमध्ये कूच करत पुढे सरकण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी परिस्थितीही अनुकूल असून तो तो वेगाने प्रगती करतो आहे. 4 जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

यावर्षी मान्सूनचे आगमन चार दिवस उशीरा होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून हा या वर्षी 4 जून रोजी दाखल होणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.
शरद मँगो : शरद पवारांच्या नावाने आंबा !
दरवर्षी मान्सून 22 मे रोजी अंदमानात दाखल होतो. 1 जून रोजी तो केरळात दाखल होतो. आणि 7 जून रोजी तो महाराष्ट्रात दाखल होतो. मात्र यंदा त्याने सर्वांचे अंदाज चुकवत तीन दिवस आधीच येण्याची शक्यता आहे.
सध्या बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मॉन्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने मंगळवार पर्यंत अंदमान बेटांच्या आणखी काही भागात पाऊस पडणार आहे.
आनंदाची बातमी : पेरणीपूर्वी एकरी दहा हजार रुपये देणार : कृषिमंत्री
दरम्यान, बंगालच्या उपसागरात ‘अमफन’ चक्रीवादळ तयार झाले आहे. हे वादळ ताशी सहा किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. पुढील 12 तासांत हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम होणार आहे.
दक्षिण व उत्तर भारतातील हवेचा दाब कमी झाला आहे. केरळात 1 जूनला दाखल होणारा मान्सून 28 मे पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच तळकोकणात 5 जूनला दाखल होणारा मान्सून 1 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा महाराष्ट्रातही मान्सून त्याच्या निर्धारित वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने अंदमानमध्ये मान्सून उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच वेगारीस ऑफ द वेदरकडून केरळात मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात 9 तारखेपर्यंत आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचे भाकित वेगारीस ऑफ द वेदरने वर्तवले आहे.
डख अंदाज : या तारखेला होणार मान्सूनचे आगमन !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1













Users Today : 19
Users Last 30 days : 772
Users This Month : 97
Users This Year : 809
Total Users : 236258