मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात देशात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत 94 ते 106 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत मान्सून हंगामाचा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज सोमवारी जाहीर केला आहे.
देशातील मान्सून पावसाची 1971 ते 2020 कालावधीत आकडेवारी पाहता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी ४२२.८ मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यातील दोन महिन्यात देशात 94 ते 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ब्रेकिंग न्यूज : अतिवृष्टीबाधितांना यंत्रणांनी तातडीने सहाय्य करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यात पश्चिम मध्य भारत, वायव्य भारत, दक्षिण भारताच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम किनारपट्टी, पूर्वमध्य भारत, पूर्वेकडील राज्ये आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसामान्य ला-निना स्थिती असून, ती मान्सून हंगामाबरोबरच वर्षाअखेरपर्यंत कायम राहणार आहे. सध्या भारतीय समुद्रात सर्वसाधारण आयओडी स्थिती आहे. उर्वरित मान्सून हंगामात आयओडी नकारात्मक स्थितीत जाण्याचे संकेत आहेत.
लक्षवेधी बातमी : शेतकऱ्यांवरील संकट दूर केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही : अजित पवार
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारण म्हणजेच 94 ते 106 टक्के पावसाची शक्यता आहे. 1971 ते 2020 कालावधीत ऑगस्ट महिन्याची पावसाची दीर्घकालीन सरासरी 254.9 मिलिमीटर आहे. ऑगस्टमध्ये दक्षिण भारताचा पूर्व भाग, वायव्य भारत आणि लगतच्या पश्चिम मध्य भारतात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम किनारपट्टी, पूर्वमध्य भारत, पूर्व भारतातील राज्य आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.
मान्सूनच्या शेवटच्या दोन महिन्यातील पावसाचा विचार करता, महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण, पूर्व विदर्भ वगळता बहुतांशी भागात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. यात उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे.
आनंदाची बातमी : हिंगोलीत होणार बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र
जुलै महिन्यात शेवटचा आठवडा वगळता देशात चांगला पाऊस झाला. 2005 मध्ये देशात जूलै महिन्याच्या 19 टक्के अधिक पाऊस पडला होता. त्यानंतर यंदाच्या जुलै महिन्यात 17 टक्के अधिक पाऊस झाला आहे. जुलैमध्ये चार कमी दाब प्रणाली तयार झाल्या, त्या 21 दिवस सक्रिय होत्या. तर मान्सूनचा आस तब्बल 26 दिवस दक्षिणेकडे होता. ला-निना स्थिती बरोबरच, मेडियन ज्युलियन आसोलेशन देखील पोषक स्थितीत राहिला. यातच आणि अरबी समुद्रावरून मान्सून प्रवाह जोरदार असल्याने चांगला पाऊस झाला. असल्याचे डॉ. महापात्रा यांनी यावेळी सांगितले.
लक्षवेधी बातमी : शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी अभ्यासक्रमात बदल करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1