शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. उशिराने दाखल होणार मान्सून वेळेत दाखल होईल असा नवा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मान्सून जूनमध्ये पाठ फिरवण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर यंदा एल निनोचा धोका असला तरी मान्सून दिलासादायक असेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
धक्कादायक : पाच वर्षात तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढणार ?
दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात दाखल झालेल्या मॉन्सूनची अडखळलेली वाटचाल आता अनुकूल झाली आहे. येत्या 24 तासात मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांचा अधिकचा भाग व्यापणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात मान्सून पाठ फिरवण्याची शक्यता आहे. हवामानातील बदल आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जून ते सप्टेंबरपर्यंत भारतामध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य राहू शकतो, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
आनंदाची बातमी : केळी महामंडळाची लवकरच होणार निर्मिती
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा एकदा का जोर वाढला तर 4 जूनच्या आसपासच मान्सून केरळमध्ये दाखल होईल. या वर्षीचा मान्सूनचा पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 4% च्या मॉडेल त्रुटीसह 96 % असण्याची शक्यता आहे. यामुळेच यंदाचा मान्सून हा सामान्य राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेले महत्त्वाचे अपडेट्स…
1. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जूनमध्ये भारतात होणारा पाऊस हा सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
2. जूनमध्ये भारतात दक्षिण द्वीपकल्प, पश्चिम राजस्थान, लडाखमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.
3. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023 मध्ये उष्णतेचा तडाखा कमी जाणवला तर मे 2023 मध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.
4. पुढच्या काही दिवसांमध्ये हवामानातील बदल आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
5. नैऋत्य मान्सून अंदमान समुद्र, अंदमान आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागरात पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 4 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे.
ब्रेकिंग : बैलगाडा शर्यतीचे हे आहेत नवे नियम

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1