राज्यात मागील काही महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे हवामानात कमालीचा बदल झाला. या हवामान बदलाचा जबरदस्त फटका राज्यातील शेतीला बसला आहे. या हवामान बदलामुळे राज्यातील सुमारे 2 लाख हेक्टरवरील फळबागा धोक्यात आल्या आहेत.
राज्यात मागील काही दिवसांचा म्हणजेच मागच्या वर्षीचा नोव्हेंबर महिना आणि जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा त्याचा विचार केला तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये वादळी वारे पाऊस व गारपीट झाली. यामुळे राज्यातील जवळजवळ दोन लाख 58 हजार तर फळपिकांचे अतोनात नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. जर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचा विचार केला तर हे थंडीचे प्रमुख महिने आहेत. परंतु या महिन्यांमध्ये देखील राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक फरकाने वादळीऱ्या सोबत चांगलाच पाऊस झाला.
यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर, पुणे, कोकण, विदर्भ आणि औरंगाबाद व लातूर विभागात नैसर्गिक आपत्तीत पहिल्या पंधरवड्यात 16 जिल्ह्यात आणि 28 व 29 डिसेंबर च्या अवकाळी पावसाने पुन्हा पंधरा जिल्ह्यातील एकूण दोन लाख तीन हजार 106 हेक्टरवर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले. जानेवारी महिन्याच्या पहिल्या 23 दिवसात 32.8 टक्के पाऊस पडला. यामध्ये पुन्हा 11 जिल्ह्यातील 54 हजार 960 हेक्टरदोन लाख 58 हजार 66 हेक्टरवरील गहू, ज्वारी, मका, भात इत्यादी पिकांचे तर फळबागांमध्ये केळी, आंबा, द्राक्ष, डाळिंब कलिंगड व विविध प्रकारचा भाजीपाला व फळ पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
हेही वाचा :
बारामतीत चक्क मिरचीसाठी होमिओपॅथी औषधाचा वापर
सातबारा उतारा होणार बंद; मिळणार प्रॉपर्टी कार्ड
लातूरमध्ये उभारली जाणार बांबूपासून इथेनॉल निर्मितीची रिफायनरी
२०५० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
पोकरा’अंतर्गत 65 हजार शेतकऱ्यांना लाभ : प्रकल्प संचालक इंद्रा मालो
पशुसंवर्धनविषयी केंद्राकडून सहकार्य मिळावे : सुनील केदार
या वातावरणाचा परिणाम आंबा फळबाग आवर मोठ्याप्रमाणात झाला असून ढगाळ वातावरण व आतमधून पडणारा पाऊस यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, यामुळे हापूस आणि केसर आंबा उत्पादन 15 टक्क्यांपर्यंत घट याचा प्राथमिक अंदाज आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा