जत तालुक्यातील माडग्याळी मेंढी देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढ्यांच्या जातींपैकी एक असून, ही जात मांसासाठी प्रसिद्ध आहे. ही जात काटक आहे. इतर मेंढ्यांच्या तुलनेत अधिक रोगप्रतिकारक आहे. माडग्याळी मेंढीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्यास उत्पादनक्षमतेसह आर्थिक मूल्य वाढणार आहे.
अशा या दुष्काळी खडकाळ व ओसाड माळरानावर अस्तित्व टिकवून ठेवलेल्या माडग्याळी मेंढीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळावी, यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या राष्ट्रीय समितीच्या (बीआरसी) बैठकीत पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. तसे लेखी पत्र आमदार विक्रमसिंह सावंत यांना दिले आहे.
मोलाचा सल्ला : सीताफळ प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष देण्याची गरज : कुलगुरु डॉ. भाले
अनेक राज्यांतून व्यापारी येथील माडग्याळ बाजारात व्यापारासाठी येतात. लाखो रुपयांची उलाढाल होते. माडग्याळी मेंढीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्यास उत्पादनक्षमतेसह आर्थिक मूल्य वाढणार असून, मेंढपाळाच्या मुलांना प्रोत्साहन मिळेल. लोकांचे जीवनमान उंचवावे, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
माडग्याळी मेंढी शासन पातळीवर दुर्लक्षित आहे. जी.आय. मानांकन मिळावे, यासाठी आमदार सावंत यांनी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडे मागणी केली होती. मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन निवेदनही दिले होते. त्याच अनुषंगाने मंत्री केदार यांनी केलेला पाठपुरावा, येणाऱ्या ‘बीआरसी’च्या बैठकीत महाराष्ट्राला सकारात्मक निर्णय मिळेल, असे लेखी आश्वासन दिले.
हे नक्की वाचा : कृषि क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षणाला चालना देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
जत तालुक्यातील माडग्याळला ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याची भीषण स्थिती दर्शवणारे येथील वास्तविक चित्र सबंध महाराष्ट्राला पाहायला मिळते. दुसरीकडे, त्याच मातीत माडग्याळी मेंढीचा जन्म होतो. त्याचे महत्त्व महाराष्ट्रातील जनतेला आहेच; आता देशाच्या कानाकोपऱ्यातही माडग्याळी मेंढीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तालुक्यातील माडग्याळी मेंढ्यांची संख्या ५६ हजार २५९ आहे; विशेषतः येथे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळसह अनेक राज्यांत या मेंढीला मागणी आहे. अनेक राज्यांतून व्यापारी येथील माडग्याळ बाजारात व्यापारासाठी येतात. लाखो रुपयांची उलाढाल होते; मात्र माडग्याळी मेंढीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्यास उत्पादनक्षमतेसह आर्थिक मूल्य वाढणार असून, मेंढपाळाच्या मुलांना प्रोत्साहन मिळेल, अशी जतकरांना अपेक्षा आहे.
वाचनीय लेख : कृषी पर्यटन व्यवसायात या आहेत, रोजगाराच्या नव्या संधी
माडग्याळ, परिसरातील मेंढपाळांनी माडग्याळ मेंढी ही जात विकसित केली आहे. पांढरा रंग व त्यावर तपकिरी रंगाचा भाग, फुगीर नाक, लांब पाय, निमुळती व लांब मान, शिंगे नसलेल्या या मेंढीमध्ये काटक व अवर्षण स्थितीत टिकाव धरून राहण्याची क्षमता आहे. या मेंढीची शरीरवाढ चांगली आहे.
मेंढीच्या कोकराचे जन्मतः वजन तीन ते पाच किलो असते. तीन महिने वयाच्या वेळचे वजन 22 किलो होते. पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन 45 ते 50 किलो इतके असते. या मेंढ्याच्या अंगावर लोकर कमी असते. माडग्याळ नराचे वजन सर्वसाधारण ४० ते ५० किलो, तर मादीचे वजन ३५ ते ४० किलो इतके असते. त्यामुळे देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढ्यांच्या जातींपैकी माडग्याळ ही जात प्रमुख मानली जाते.
ब्रेकिंग न्यूज : यलो अलर्ट : महाराष्ट्रात आज ९ जिल्ह्यात पाऊस ?
जत तालुक्यातील माडग्याळी मेंढीला जी. आय. मानांकन मिळावे, यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत सतत पाठपुरावा करत असून, पशुसंवर्धन मंत्र्यांना भेटून यासाठी सकारात्मक पाऊल उचलावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी येणाऱ्या राष्ट्रीय समितीत माडग्याळी मेंढीला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
या जातीचे जतन, पैदास आणि संवर्धनाचे काम प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. म्हणून मूळस्थानी माडग्याळ येथे मेंढीचे संशोधन होऊन उत्तम प्रकारची प्रजाती निर्माण व्हावी, उत्पन्न वाढावे याचा पशुपालकांना फायदा व्हावा, लोकांचे जीवनमान उंचवावे, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राष्ट्रीय शेळी-मेंढी संशोधन केंद्र व्हावे, अशीही मागणी फार वर्षांपासून होत आहे.
हे नक्की वाचा : उन्हामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांचा हा आहे सल्ला !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1