पेट्रोल आणि डिझेल तसेच स्वयंपाकाचा गॅस इत्यादी तर महागाईच्या उंबरठ्यावर पोहोचलेच आहेत, परंतु आता त्या पाठोपाठ राहिलेली कमतरता महावितरणने पूर्ण केली आहे. अगोदरच महागाईमुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महावितरणने विजेच्या दरात वाढ करून परत एक झटका दिला आहे.
मोठी बातमी : स्मार्ट मधील २३१ प्रकल्पांना मान्यता
महावितरणने इंधन समायोजन आकारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली असून, त्यामुळे अगोदरच महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. महावितरणने इंधन समायोजन आकार मध्ये वाढ केल्यामुळे आता वीज ग्राहकांना जास्तीच्या आकाराने वीज खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला आर्थिक फटका बसणार आहे. जर आपण इंधन समायोजन आकारामध्ये वाढीसंदर्भात विचार केला तर जेव्हा कोळसा आणि इंधनाचे दर वाढतात त्यावेळी MERC च्या परवानगीने ही दरवाढ केली जाते.
ब्रेकिंग न्यूज : विठ्ठला ! जनतेच्या सर्व अडचणी दूर कर : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत असलेल्या इंधन समायोजन दरामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. या समायोजन आकार वाढीचा विचार केला तर मार्च 2022 ते मे 2022 पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता, त्याच्यापेक्षा काही अधिक पटीने सध्याचा इंधन समायोजन आकार वाढवण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात देखील प्रतियुनिट पंचवीस पैशांची वाढ महावितरणने केली होती.
हे वाचा : यवतमाळ जिल्ह्यात बनावट किटकनाशकांसह खतांचा साठा जप्त
अशी आहे सध्याची दरवाढ : 0 ते 100 युनिटसाठी पूर्वी 10 पैसे होते ते आता 65 पैसे करण्यात आले आहेत. 101 ते 300 युनिटसाठी पूर्वी 20 पैसे होते ते आता 1.40 पैसे करण्यात आले आहेत. 301 ते 500 युनिटसाठी पूर्वी 25 पैसे युनिट होते ते आता 2.5 पैसे युनिट असा दर करण्यात आले आहेत. तर 500 युनिटच्या वर पूर्वी 25 पैसे पर युनिट होते ते आता 2.35 पैसे युनिट असा दर करण्यात आले आहेत.
मान्सून अपडेट : राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1