राज्यात कांदा उत्पादक शेतकरी दराच्या घसरणीमुळे संकटात सापडला आहे. इतर शेतीमालाचे दरही पडले आहेत. त्यातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केली आहे.
हे नक्की वाचा : फडणवीसांच्या आश्वासनानंतरही नाफेडकडून कांद्याची खरेदी नाही
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, कांदा उत्पादनाचा खर्च आणि मिळणारा दर पाहता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. अशावेळी राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे. याशिवाय केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाफेडने निर्यातीसंदर्भातील ठोस कार्यक्रम राबविला पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या निर्यातील बंधन असता कामा नये. दोन दिवसांनी संसदेचे अधिवेशन सुरू होणार तेथे हा प्रश्न मांडण्यात येईल.
कांदा दर कोसळल्याने राज्य सरकारने बाजार समित्यांमध्ये नाफेडमार्फत कांदा खरेदीची घोषणा केली. मात्र, नाफेडची कांदा खरेदी होतच नाही, अस आरोप करून पवार म्हणाले, नाफेडने मार्केटमध्ये उतरून खरेदी केली असे चित्र दिसत नाही. नाफेडने शेतकऱ्यांचा कांदा निदान 1200 रुपयांनी खरेदी करावा, अशी मागणी पारनेरच्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे केली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
अर्थसंकल्प : कृषी क्षेत्रासाठी ‘या’ महत्त्वाच्या घोषणा
मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान सरकारने कांदा उत्पादकांसाठी काहीना काही पाऊले उचलली आहेत. परंतु, महाराष्ट्र सरकारमध्ये केवळ चर्चाच सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. सध्या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे. त्याला अनुदान द्या, खरेदी करा किंवा आणखी काही उपाययोजना करा. मात्र, शेतकऱ्याला मदत करा असे ते म्हणाले.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदतीसाठी राज्य सरकारशी बोलणार असल्याचे सांगून पवार म्हणाले, आजपर्यंत या देशाच्या इतिहासात शेतकऱ्यांना जात विचारायचा प्रघात नव्हता. खतांसाठी जर शेतकऱ्यांना जात विचारत असतील, तर हे अत्यंत चुकीचे असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
मोठी घोषणा : अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा : मुख्यमंत्री शिंदे
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1