ऊस हे नगदी पीक कधी आळशाच तर कधी आश्वासित हमीभावाच पीक असे दुहेरी बोलले जाते. मागील काही वर्षांपासून उसाच्या बाबतीत शेतकऱ्यांना उत्पादनात खर्च तसेच उत्पादन कसे वाढवायचे हे आवाहन समोर आले आहे. खर्च कमी करून उत्पादन वाढवायचा पहिला पर्याय म्हणजे रासायनिक खताला लागणार खर्च कमी करणे. रासायनिक खतांवर अवलंबून राहू नका असा सल्ला देखील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिला आहे. जो की हा सल्ला प्रत्यक्षात साकारला आहे तो बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये.
कमी खर्च आणि भरपूर फायदा : बारामती कृषी केंद्रामध्ये सध्या कृषी प्रदर्शन सुरू आहे जे की या प्रदर्शनात अशा अनेक शेतीविषयक गोष्टी असतात जे शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात आणि त्या गोष्टींपैकीच एक गोष्ट म्हणजे हा प्रयोग. महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे आर्थिक राजकारण सुधारले ते फक्त आणि फक्त उसामुळे. दरवर्षी राज्यात जवळपास साडे दहा लाख हेक्टर पेक्षा जास्तच क्षेत्रावर उसाची लागवड केली जाते. तुम्हाला या उसाच्या आकड्यावरून समजलेच असेल की राज्याच्या अर्थकारणात उस पिकाचे किती महत्व आहे. उसाची लागवड केल्यापासून ते उसाची तोडणी करेपर्यंत लागणार खर्च हा हजारो कोटी रुपयांमध्ये जातो.
उसाला एकरी रासायनिक खताचा खर्च हा ३० ते ४० हजार रुपये पर्यंत जातो. मागील काही वर्षात नॅनो टेक्नॉलॉजी चे युग आले आहे जे की ते युग आता शेतीच्या बांधावर पोहचले आहे. उसाच्या पिकाला खताची मात्रा देण्यात या टेक्नॉलॉजी चा मोठा सहभाग आहे. बारामती मधील कृषी विज्ञान केंद्रात वैज्ञानिकांनी असा उसाचा प्रयोग केला आहे जे की उसाच्या 86032 या जातीवर नॅनो टेक्नॉलॉजी ने खत व्यवस्थापन केले आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
एफआरपी न देणारे 28 कारखाने लाल यादीत
शिलकी ऊसाची जबाबदारी कारखान्यावर !
आता केवळ 90 सेकंदात माती परीक्षण
पीक पद्धतीत मोठा बदल; मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात राजमा
१९६० ते १९६५ सालापासून शेतकरी उसासाठी लागणार जो खर्च आहे तो कमी करण्याच्या मार्गात आहे जे की खर्च कमी करून उत्पादन वाढवणे हा दृष्टिकोन शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या या आहवानाचा सामना ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट त्यांना दिलासा देण्याचे काम करत असते. जे की सतत नवीन नवीन तंत्रज्ञान शोधायच्या मागे ते लागलेले असतात. नॅनो टेक्नॉलॉजी ही सुद्धा एक अत्यंत महत्वाची बाब आहे जी भविष्यात मोठा पर्याय ठरणार आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा