मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या जायकवाडी धरणात 90 टक्के पाणीसाठा झाला असून 31 वर्षानंतर प्रथम जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत व त्या माध्यमातून 9432 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. जर आकडेवारीचा विचार केला तर 30 जुलै 1991 ला जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते.
ब्रेकिंग न्यूज : मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका
जायकवाडी धरण भरल्यामुळे आता मराठवाड्यातील बीड, परभणी तसेच औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील एक लाख 84 हजार हेक्टरला फायदा होणार आहे. गेल्या चार वर्षापासून जायकवाडी धरण सलग भरत असून, मागच्या वर्षी 29 सप्टेंबरला जायकवाडी धरणातून दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले होते.

यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे हंगाम देखील उत्तम येणार असून सोमवारी संध्याकाळी जायकवाडीत 36 हजार 129 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे गोदापात्राच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी विसर्ग वाढविण्यात येणार असून, लोकांनी गोदावरी पात्रात तसेच काठावर जनावरे सोडू नयेत, असा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाची गोष्ट : पावसाळ्यात जनावरांची अशी घ्या काळजी
तसेच येणाऱ्या काळासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, जायकवाडीतून आठ दिवसापासून धरणाच्या जलविद्युत केंद्रातून 1589 उजव्या कालव्यातून 600 क्युसेक पाणी सोडले जात आहे. मागच्या वर्षी जायकवाडी धरणात जुलै महिन्यात अवघा 35 टक्के पाणी साठा होता. यंदा तो 90 टक्क्यांवर गेला आहे.
नक्की वाचा : पीकविमा योजनेसाठी 35 लाख शेतकऱ्यांचे अर्ज

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1













Users Today : 19
Users Last 30 days : 772
Users This Month : 97
Users This Year : 809
Total Users : 236258