परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या तीन पिकांच्या वाणास नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. उपमहासंचालक डॉ. टि. आर. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. महाराष्ट्रातील या तीन पिकांच्या वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याने आता भविष्यात महाराष्ट्राबाहेरही या वाणांची लागवड होणार आहे.
मोठी बातमी : पावसामुळे राज्यात तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
या बाबत माहिती देताना संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून वाण मान्यतेबाबतचे पत्र विद्यापीठास मिळाले असून, त्यामध्ये करडई पिकांच्या पीबीएनएस 184, देशी कापसाच्या पीए 837 आणि खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती वाणास मान्यता प्राप्त झाली अस्क्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे करडई पिकांच्या पीबीएनएस 184 वाणास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडु या राज्यांकरिता लागवडीसाठी प्रसारण करण्यास मान्यता मिळाली आहे.
ब्रेकिंग न्यूज : जीएसटी निणर्याचा शेतकऱ्यांना दुहेरी फटका
ते म्हणाले, कापसाच्या पीए 837 या वाणाची आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात लागवडीसाठी प्रसारण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती वाणास महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी प्रसारण करण्यास मान्यता मिळाली आहे. हे वाण केंद्रीय वाण प्रसारण उपसमितीनी प्रसारित केले आहे. त्यामुळे या वाणांचे बीजोत्पादन हे बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येते. विशेष म्हणजे वाणांचा प्रसार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून वाणांचा प्रचार व प्रसार बाहेरील राज्यात मोठया प्रमाणावरही होणार अस्क्याचेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाचा सल्ला : कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग का द्यावा ? : नितीन गडकरी यांचा सवाल
करडई पीक पीबीएनएस 184 या वाणाचे उत्पादन हेक्टरी 1,531 किलो एवढे आहे. यात तेलाचे प्रमाण 31.3 टक्के इतके आहे. या वाणास परिपक्व होण्यासाठी 120 ते 123 दिवसांचा कालावधी लागतो.
खरीप ज्वारीमध्ये परभणी शक्ती हा वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आला असून, यापूर्वीच देशातील पहिला जैवसमृद्ध (बायोफोर्टीफाईड) वाण म्हणून परभणी शक्ती या वाणास महाराष्ट्र राज्य वाण प्रसारण समितीने मान्यता दिली आहे. परभणी शक्ती वाणातील धान्यात प्रती किलो 42 मि. ग्रॅम लोहाचे प्रमाण आहे. तसेच या वणात जस्ताचेही प्रमाण जास्त आहे.
मान्सून अपडेट : राज्यात पुन्हा 4 ते 5 दिवस पाऊस मुक्कमी
देशी कापूस वाण पीओ 837 या वाणाच्या कापसाचे उत्पादन हेक्टरी 15 ते 16 क्विंटल आहे. धाग्याची लांबी 28 मिली मिटर इतकी आहे. या वाणास पक्व होण्यासाठी 150 ते 160 दिवसांचा कालावधी लागतो. विशेष म्हणजे हा वाण रसशोषक किडी आणि दहीया रोगास सहनशील आहे.
महाराष्ट्रातील या तीन पिकांच्या वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याने आता भविष्यात महाराष्ट्राबाहेरही या वाणांची लागवड होणार आहे.
महत्त्वाच्या टिप्स : शंखी गोगलगायी नियंत्रणाच्या 13 टिप्स !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1