राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेली शेती पिके अवकाळी पावसामुळे झोपल्याने आणि गारपिटीमुळे अक्षरशः भुईसपाट झाली पाठ झाली आहे. याच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी हवालदार झाले आहेत. याच शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
मोठी बातमी : कांदा अनुदानासाठी या कालावधीत करावा लागणार अर्ज !
राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल 1370 हेक्टर रब्बी हंगामातील शेती पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. तर अशातच यंदाही शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. आता अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्क्यांहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले आहे; असे शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरतात. तर यानुसार राज्यातील 2 हजार 663 शेतकऱ्यांना 1 हजार 369 क्षेत्रासाठी एनडीआरएफ नव्या निकषानुसार मदत दिली जाणार आहे.
हे नक्की वाचा : फायद्याची मोत्यांची शेती
नवीन एनडीआरएफच्या निकषानुसार रब्बीच्या जिरायती पिकांसाठी 8 हजार 700 रुपये हेक्टर, बागायती पिकांना 17 हजार रुपये हेक्टर व फळपिकांना 22 हजार 500 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत दिली जाणार आहे. यामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

महत्त्वाच्या टिप्स : जिवामृताचे हे आहेत सर्वोत्तम 6 फायदे

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1