सीताफळ शेतीत उत्पादन वाढवताना खर्च कमी करा, सीताफळ शेतीत सेंद्रिय घटकांचा वापर वाढवावा. कीड येण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करा विशेषत: सीताफळाचे दर्जेदार उत्पादन वाढवताना त्यावरील प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष देण्याची गरजेचे झाले आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी केले.
हे नक्की वाचा : कृषि क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षणाला चालना देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
सीताफळ महासंघ (पुणे), कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने काल रविवारी कृषी विद्यापीठाच्या कमेटी सभागृहात झालेल्या राज्यस्तरीय सीताफळ कार्यशाळेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांतप्पा खोत, सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी, सचिव अनिल बोंडे, माजी आमदार कृष्णराव इंगळे आदी उपस्थित होते.
वाचनीय लेख : कृषी पर्यटन व्यवसायात या आहेत, रोजगाराच्या नव्या संधी
डॉ. भाले म्हणाले, की सीताफळ हे नाशवंत प्रकारातील फळ ओळखले जाते. आज या फळाच्या उत्पादनातून अनेक शेतकरी चांगले पैसे मिळवत आहेत. आपण यापुढील काळात सीताफळावर प्रक्रिया करून विविध पदार्थ कसे बनवता येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे झाले तर उत्पादकाला शाश्वती मिळेल. सीताफळाच्या गरापासून काही पदार्थ बनवले जात आहेत. अधिकाधिक खाद्यपदार्थ, पेयात सीताफळाचा वापर वाढला तर आपल्याला अधिक फायदा होईल. आज विद्यापीठाने आपल्या संशोधनाची दिशा बदलून शेती ते लॅब असे धोरण यांनी सविस्तरपणे सीताफळ या पिकाबाबत मांडणी केली.
ब्रेकिंग न्यूज : यलो अलर्ट : महाराष्ट्रात आज ९ जिल्ह्यात पाऊस ?
श्याम गट्टाणी यांनी प्रास्ताविकात सीताफळ महासंघाची वाटचाल मांडतानाच राज्यात कसे काम सुरू आहे, याचा आढावा घेतला. सीताफळाची सध्याची स्थिती, उत्पादकांसमोरील संधी, अडचणीबाबत ऊहापोह केला. सीताफळाचे नेमके क्षेत्र किती आहे, याची आकडेवारी कृषी खात्याने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. कार्यक्रमात सीताफळापासून तयार केलेल्या विविध थंडपेयांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हे नक्की वाचा : उन्हामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांचा हा आहे सल्ला !
तांत्रिक सत्रात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. शशांक भराड यांनी सादरीकरण करीत सविस्तरपणे मांडणी केली. याशिवाय विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. गोविंद जाधव, डॉ. बाळकृष्ण जडे, शेतकरी विनय बोथरा आदींनी सीताफळ पिकाबाबत विविध विषयांवर मांडणी केली. कार्यशाळेसाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. राज्यभरातून शेकडोंच्या संख्येने सीताफळ उत्पादक कार्यशाळेला उपस्थित होते.
मान्सूनची बातमी : केरळमध्ये पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा
👇 👇 👇