• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

कृषी पर्यटन व्यवसायात या आहेत, रोजगाराच्या नव्या संधी

शेतीमित्र by शेतीमित्र
May 16, 2022
in कृषी पर्यटन
0
कृषी पर्यटन व्यवसायात या आहेत, रोजगाराच्या नव्या संधी
0
SHARES
2
VIEWS

सध्याच्या धावपळीच्या युगात विशेषतः शहरातील नागरिकांना विरंगुळा हवा असतो. परंतु हा वेळ केवळ रिकामा न घालवता त्याला निसर्गाच्या सानिध्यात राहता आले आणि त्यातही पारंपरिक आणि आधुनिक शेतीची माहिती घेता आली तर विरंगुळ्याबरोबरच माहितीपूर्ण पर्यटनाची सुवर्णसंधी साधता येईल. त्याचबरोबर शेतकरी आणि संबंधितांना रोजगारदेखील उपलब्ध होईल. रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ साधण्याचा हाच प्रयत्न पर्यटन विभागाने केला आहे.

राज्याच्या पर्यटन विभागाने नुकतेच आपले कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. या धोरणामुळे शहरी पर्यटकांना शेतीची प्रत्यक्ष भेटीतून माहिती, शेतकऱ्यांच्या जीवनाचे दर्शन, ग्रामीण संस्कृतीशी ओळख असा अनुभवांचा ठेवा मिळतोय. शेतीची कामे कशी चालतात त्याचा  स्वतः  अनुभव  घेऊन  निसर्गाशी मैत्री करण्याची संधी मिळतेय आणि निरामय आयुष्य जगण्याची प्रेरणा देखील मिळतेय.

फायद्याच्या टिप्स : ‘कृषीपर्यटन’ काय आहे पर्यटनाची नवी संकल्पना

आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विभाग व कृषी पर्यटन विकास कंपनी (एटीडीसी) संयुक्त विद्यमाने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कृषी पर्यटन विकासाशी संबंधित कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात राज्यात नाविन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रयत्नांना व कल्पनांना पुरस्कृत केले जाणार आहे.

कृषी-पर्यटन ही एक उदयोन्मुख आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संकल्पना आहे. कृषी पर्यटनामुळे नवीन अर्थाजनाच्या संधी निर्माण होत आहेत. याद्वारे गावांचा शाश्वत विकास होईल. 2020 मध्ये धोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून, गेल्या दोन वर्षांत केवळ ऑनलाइन कृषी पर्यटन परिषद झाली होती, यंदा कोविडबाबतचे नियम शिथील झाल्याने आणि उद्योगधंद्यांना संजीवनी मिळाल्याने प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यामध्ये अनेक कृषी पर्यटन केंद्र संचालकांना कृषी पर्यटन विकासासाठीच्या उपाययोजनांविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल.

फायद्याचा लेख : अशी बनवा परसबागेलाच न्युट्रीशनल गार्डन

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे नेहमी सांगतात, आपल्या राज्यात बर्फ आणि वाळवंट सोडले तर पर्यटनाच्या सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. गड किल्ले, थंड हवेची ठिकाणे, समुद्र किनारे, डोंगर दऱ्यांनी संपन्न निसर्ग, ऐतिहासिक वास्तू आदींसह वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती ही देखील महाराष्ट्राची विशेष ओळख आहे. अजिंठा वेरूळ सारख्या लेण्या, बिबीका मकबरा, पाणचक्की, लोणार सरोवर, प्राचीन मंदिरे, अष्टविनायकाची ठिकाणे, देशातील ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख मंदिरे यांची जागतिक स्तरावर कीर्ती आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर रिसॉर्टच्या माध्यमातून राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पर्यटनाच्या या पारंपरिक साधनांना राज्याच्या पर्यटन विभागाने नावीन्यपूर्ण कल्पनेची जोड देऊन साहसी पर्यटन, कॅराव्हॅन, बीच शॅक्स, कृषी पर्यटन आदींच्या माध्यमातून पर्यटन विकासाची धोरणे जाहीर केली आहेत. यातील कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना व्यावसायिक लाभ तर होतोच शिवाय रोजगार निर्मितीबरोबरच पर्यटनाची आणखी एक संधी उपलब्ध होत आहे.

महत्त्वाच्या टिप्स : अशी फुलवा परसबाग !

पर्यटन संचालनालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्या 354 कृषी पर्यटन केंद्र कार्यरत आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांच्या रोजगारात सुमारे 25 % वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कृषी पर्यटन केंद्रांवर भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या काही लाखांमध्ये आहे. इतकेच नाही तर कृषी पर्यटनातून विशेषतः ग्रामीण भागातील सुमारे एक लाख महिला आणि तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कृषी पर्यटन केंद्रांमुळे केवळ शेतकऱ्यांच्या जीवनाला नव्हे तर संपूर्ण गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला हातभार लागल्याचे पुणे, रायगड, सातारा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये अनुभवायला आले आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.

हा लेख वाचा : फळझाडांची कुंडीतील लागवड

कृषी पर्यटन विकास हे करिअरचे अनोखे क्षेत्र ठरू शकते. म्हणूनच या क्षेत्रातील विविध पैलूंची माहिती इच्छुकांपर्यंत पोहचवण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील मार्गदर्शक या कार्यक्रमात पर्यावरण पूरक उपक्रम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कृषी पर्यटनाची भूमिका अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या नव्याने आणि वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

ब्रिजकिशोर झंवर विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई.

महत्त्वाच्या गोष्ट : शेतीमध्ये फळमाशीचा धोका वाढतोय !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: १६ मे आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिन विशेषAgri-tourism is a concept that strengthens the rural economyDepartment of Tourism announces agri-tourism policyMay 16 International Agri-Tourism Day Specialकृषी पर्यटन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संकल्पनापर्यटन विभागाचे कृषी पर्यटन धोरण जाहीर
Previous Post

यलो अलर्ट : महाराष्ट्रात आज ९ जिल्ह्यात पाऊस ?

Next Post

कृषि क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षणाला चालना देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

Related Posts

आज बैल पोळा, सर्जाराजाचा सण
कृषी पर्यटन

आज बैल पोळा, सर्जाराजाचा सण

August 26, 2022
अशी बनवा परसबागेलाच न्युट्रीशनल गार्डन
कृषी पर्यटन

अशी बनवा परसबागेलाच न्युट्रीशनल गार्डन

March 6, 2022
फळझाडांची कुंडीतील लागवड
कृषी पर्यटन

फळझाडांची कुंडीतील लागवड

February 4, 2022
अशी फुलवा परसबाग !
कृषी पर्यटन

अशी फुलवा परसबाग !

February 3, 2022
कृषी व ग्रामीण पर्यटनाला येत्या काळात वाव; आंतरराष्ट्रीय परिषदेत मान्यवारांचा सूर
कृषी पर्यटन

कृषी व ग्रामीण पर्यटनाला येत्या काळात वाव; आंतरराष्ट्रीय परिषदेत मान्यवारांचा सूर

May 17, 2021
‘कृषीपर्यटन’ काय आहे पर्यटनाची नवी संकल्पना
कृषी पर्यटन

‘कृषीपर्यटन’ काय आहे पर्यटनाची नवी संकल्पना

May 15, 2021
Next Post
कृषि क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षणाला चालना देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

कृषि क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षणाला चालना देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230525
Users Today : 20
Users Last 30 days : 1344
Users This Month : 124
Users This Year : 4855
Total Users : 230525
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us