अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ज्वारी पिकासारख्या कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकाचे महत्त्व वरचेवर वाढत असून, अधिक उत्पादन आणि काटेकोर पाणी वापराच्या दृष्टीने ठिबक सिंचनावर ज्वारी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कलही वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पाथरुड (ता. भूम) परिसरात शेकडो एकर रब्बी ज्वारी सध्या ठिबक सिंचनावर डोलत असून, पाथरुड परिसरात अनेक शेतकऱ्यांचा हा प्रयोग लक्षवेधी ठरत आहे.
ब्रेकिंग न्यूज : आता शहीद झालो तरी माघार नाही : रविकांत तुपकर
सर्रास फळांसह भाजीपाला तरकारी पिकांना ठिबक सिंचनचा वापर केला जातो. मात्र, अलीकडच्या काळात काटेकोर पाणी वापराच्या दृष्टीने सर्वच पिकांना ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला जात आहे. आता ज्वारी सारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पिकालाही ठिंबक सिंचनाच वापर केला जातो. पाथरुड (जि. उस्मानाबाद) परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीला ठिबक सिंचन केले आहे. यामुळे पाण्याची बचत तर होणारच असून, कमी श्रमात ज्वारी पिकला सारखे पाणी मिळत आहे. परिणामी ज्वारीचे उत्पन्न चांगलेच वाढणार आहे.

भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात ज्वारीचे विक्रमी उत्पन्न घेतले जाते. पाथरुड परिसरात हजारो हेक्टरवर ज्वारीचा पेरा केला जातो. यासाठी या शिवारात सिंचन करण्यासाठी छोटे मोठे तलाव आणि विहिरींचा वापर होतो. परंतु ज्वारी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना या भागात पाणी कमी पडते. कारण या भागात मोठा तलाव नसल्याने पाणी मोजकेच उपलब्ध आहे. म्हणून भाजीपाला पिकांसाठी पूर्वी ठिबक सिंचनचा वापर केला जात होता. परंतु ज्वारीसारख्या पिकालाही पाथरुड परिसरातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनचा वापर पाणी देण्यासाठी सुरु केला आहे.
चिंताजनक : यंदा यामुळे घटणार गहू आणि हरभऱ्याचे उत्पादन !
ज्वारीसाठी ठिबक सिंचनचा वापर केल्यामुळे कमी पाण्यात कमी श्रमात ज्वारीचे पीक हे ओलिताखाली आणणे शेतकऱ्यांना सहज शक्य झाले आहे. ठिबक सिंचन पद्धतीने ज्वारी पिकास पाणी एकसारखे मिळू लागल्याने ज्वारीच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रामध्ये रब्बी ज्वारीची लागवड 34 ते 35 लाख हेक्टर क्षेत्रावर केली जाते. त्यापासून 24.9 लाख टन उत्पादन मिळत असले तरी सरासरी उत्पादकता कमी आहे. रब्बी ज्वारीस दाण्याची व कडब्याची उत्तम प्रत या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे खरीप ज्वारीपेक्षा जास्त दर मिळतो. त्यामुळे महाराष्ट्रात रब्बी ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड होते.
ज्वारीसाठी ठिबक सिंचनचा वाढत वापर
मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असणाऱ्या भागात ओलावा संवर्धन व पाण्याचा काटकसरीने वापर आवश्यक असतो. सद्यःस्थितीमध्ये पावसाचा अनियमितपणा वाढला आहे. भूजल पातळीही कमी झाली आहे. पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाणी उपलब्ध न झाल्यास उत्पादन कमी येते. त्यामुळे शक्य असल्यास संरक्षित पाण्याचा वापर उपयोगी ठरतो. रब्बी ज्वारीला पाण्याची गरज असलेल्या व वाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी मिळणे गरजेचे असते. मात्र पाणी कमी असताना प्रवाही सिंचन शक्य होत नाही. कारण त्यात पाण्याचा भरपूर वापर होऊनही जमिनीत कायम वाफसा राहत नाही. पर्यायाने ज्वारीकडून अन्नद्रव्यांचे योग्य शोषण होत नाही. परिणामी उत्न्न्न कमी मिळते. त्यामुळे आता ज्वारीसाठी ठिबक सिंचनचा वापर वाढत आहे.
खूशखबर : यंदा द्राक्षाच्या विक्रमी निर्यातिची शक्यता
ज्वारीला ठिबक सिंचनचा वापर असा करावा
ठिबक सिंचन संचाचा वापर करण्यासाठी रब्बी ज्वारीच्या लागवड पद्धतीत थोडासा बदल करावा लागतो. आपल्याकडे असलेला ठिबक संच आणि भाजीपाला पिकासाठीच्या लॅटरल वापरावी लागते. मध्यम ते हलक्या जमिनीसाठी दोन ओळींतील अंतर 45 सेंमी व दोन झाडांतील अंतर 15 सेंमी इतके ठेवावे. मध्ये 75 सेंमीचा मोकळा पट्टा ठेवावा लागतो. एका जोडओळीसाठी एक ठिबक नळी वापरावी लागते.

भारी जमिनीसाठी दोन ओळीतील अंतर 60 सेंमी व दोन झाडांतील अंतर 12 सेंमी इतके ठेवावे. यामुळे प्रति हेक्टर ज्वारीच्या झाडांची संख्या राखता येईल. उगवणीनंतर कोळपणीच्या साह्याने प्रत्येक ओळीस माती लावून वरंबा तयार करावा लागतो.
चिंताजनक : चालू महिन्यात पाऊस : पिकांना धोका ?
ज्वारीसाठी शेताच्या किंवा पिकाच्या ओळीच्या लांबीनुसार 12 किंवा 16 मिमी व्यासाच्या इनलाइन नळ्या वापराव्या लागतात. यामध्ये साधारण 30 ते 40 सेंमी अंतरावरील व 2.4 लिटर प्रति तास प्रवाह असलेल्या ड्रीपर (तोट्या) अशी इनलाइन लॅटरल निवडावी लागते. उपलब्ध लॅटरलमधील ड्रीपरचा प्रवाह जास्त असल्यास भारी जमिनीसाठी त्यातील अंतर 40 ते 50 सेंमीपर्यंत असलेली इनलाइन लॅटरल निवडावी लागते.
ठिबक सिंचनासाठी 80 टक्क्यापर्यंत अनुदान
शेतकऱ्यांना ठिबक सिंचन घेण्यासाठी शासनाकडून 55 टक्क्यापासून 80 टक्क्यापर्यंत अनुदान दिले जाते. यामुळे अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात शेतकरी ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांना पाणी देणे सुखकर होऊ लागले आहे. ज्वारी या पिकाला ठिबक सिंचनचा वापर केल्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादनात वाढ होत आहे. शिवाय ज्वारीचे पीक भिजवण्याचे श्रमही कमी होत असल्याचे शेतकरी सांगतात.
मोठी बातमी : केळी तेजीत : भाव 4 हजारावर जाण्याची शक्यता !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1