पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी आता प्रदूषण नियंत्रण मंडळासह आता सरकारची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सविस्तर आदेश जारी केले आहे. नवीन वर्षात या आदेशाची अंमलबजावनी सुरू होणार आहे.
मोठी बातमी : ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना पुन्हा एकदा सुरु
पोल्ट्री व्यवसाय या ग्रामीण भागांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जाणारा व्यवसाय आहे. शेती व्यवसायाबरोबरच ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पोल्ट्री व्यवसाय म्हणजेच कुक्कुटपालन करत असतात. शेती व्यवसायात जर कधी नुकसान झाले तर कधी-कधी शेतीपूरक असलेला पोल्ट्री व्यवसाय शेतकऱ्यांचा आधार ठरला आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पोल्ट्री व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. बर्ड फ्ल्यू आणि त्यानंतर आलेल्या कोरोनाने पोल्ट्री व्यवसाय करणारा शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे आता मात्र, हाच पोल्ट्री व्यवसाय करत असताना पोल्ट्री व्यावसायिकांना बंधने घालण्यात आली असून, त्याचे आता पालन करावे लागणार आहे.

वास्तविक यापूर्वी ग्रामीण भागात असणारा हा व्यवसायाला ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत स्तरावर ना हकरत दाखला घेतला की सुरु करता येत होता. मात्र, आता हरित लवादात दाखल करण्यात आलेल्या गौरी माउलीखी यांच्या याचिकेमुळे काही बंधने घालण्यात आली आहेत. त्यानुसार आता पाच हजारांपेक्षा अधिक पक्षी असलेल्या प्रकल्पाला विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या सूनावणीत हरित लवादाने याबाबत निकाल दिला आहे. त्यानुसार पोल्ट्री व्यवसायासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळासह सरकारची विशेष परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. याशिवाय पाच हजारांहून अधिक पक्षी असलेले व्यावसायिक या अधिकार कक्षेत ठेवण्यात आले आहे.
फायद्याची बातमी : पशुपालकांच्या खात्यावर लम्पी चर्मरोगाची 10 कोटींची नुकसान भरपाई जमा
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत सविस्तर आदेश जारी केले असून, यामध्ये कुक्कुटपालन प्रकल्प उभारताना लोकवस्तीपासून पाचशे मीटर लांब तसेच नदी-नाल्यापासून दूर करावा लागणार आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय महामार्गापासून आणि मुख्य रस्त्यापासून शंभर मीटर हा प्रकल्प दूर करण्याची अट घालण्यात आली आहे. नवीन वर्षात या आदेशाची अंमलबजावनी सुरू होणार आहे.

ब्रेकिंग : राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1