महाराष्ट्रात लवकरच विद्यार्थ्यांना पाचवीपासून बारावीपर्यंत शेती हा विषय शिकवला जाणार असून, त्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार दिली आहे.
महत्त्वाची बातमी : कांद्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केली केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे ही विनंती
या निर्णयामुळे शेती सुधारेल पर्यायने शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील असे सांगून, सत्तर म्हणाले, पाचवीपासून बारावीपर्यंत शेती विषयाचे ज्ञान मिळाल्याने भविष्यात नोकरी जरी नाही लागली तरी शेती विषयात विद्यार्थी निपुण असतील हा यामागचा हेतू असून, अत्याधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेती हा विषय शिकवण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीचे धडे गिरवण्यासाठी प्रयोगशाळा म्हणून गावामध्ये असलेल्या सरकारी जागा दिल्या जाणार असल्याचे सांगून सत्तर म्हणाले, शिक्षकांना देखील काही दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिक्षण घेणारी बहुतेक मुले-मुली ही शेतकऱ्यांची असतात. ही मुले ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर सगळ्यांनाच नोकऱ्या लागत नाहीत. त्यामुळे त्यांचा वडिलोपार्जित शेतीचा धंदा समजावा, यासाठी पाचवीपासून शेतीचा विषय शिकवला जाणार असल्याची ते यावेळी म्हणाले.
मोठी बातमी : लम्पी स्कीन रोगासंदर्भात मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना
शेतात फवारणी कशी करायची, सरी कशी टाकायची, पेरणी कशी करायची, गायी म्हशींची निगा कशी राखायची, नवीन अवजारांचा वापर कसा करावा, खतांचा वापर यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. या गोष्टी लहानपणापासूनच शिकवल्या तर याचे परिणाम भविष्यात चांगले दिसतील असे सत्तार म्हणाले. दरम्यान, शिक्षकांना जर यासंबंधी योग्य प्रशिक्षण दिले तर ते विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकवतील असेही सत्तार यावेळी म्हणाले.
मोठा निर्णय : बुलढाण्यात उभारणार बांबू उद्योग !
दरम्यान, यासबंधीची सर्व माहिती आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगू त्यांचे समाधान झाले तर ते सांगतील. शिक्षणमंत्र्यांशी देखील याबाबत बोलणे केले जाणार आहे. शिक्षणमंत्री यामध्ये शेती विषयक एक तास कसा घेता येईल याबाबतचा निर्णय सांगतील असे सत्तार म्हणाले. याचा ढाचा आम्ही ठरवणार आहोत. पाचवी ते बारावीपर्यंत शेती विषयाचे शिक्षण दिले जाणार आहे. बेसिक विषय सोडून शेती विषय शिकवला जाणार आहे. याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सत्तार म्हणाले. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी कृषी विभागातील दोन लोक तसेच शिक्षण विभागातील दोन लोक अशी चार लोकांची समिती तयार केली जाईल. ही समिती चारही बाजूने अभ्यास करेल त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सत्तार यावेळी म्हणाले.
मोठी घोषणा : लम्पी स्कीन रोगावर स्वदेशी लस विकसीत : पंतप्रधानांची घोषणा
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1