आता ‘डीएपी’ मिळणार निम्म्याहून कमी किमतीत

0
485

शेतकऱ्यांना खतासाठी म्हणजेच डीएपीसाठी मोठा खर्च करावा लागतो. आता कृषी मंत्रालयाच्या सहकार्यातून उपलब्ध करून देण्यात आलेला लिक्विड युरिया म्हणजेच नॅनो डीएपी शेतकऱ्यांना युरियाच्या निम्म्याहून कमी किमतीत उपलब्ध होत असून, त्यातून शेतकऱ्यांचा डीएपीवर होणारा मोठा खर्च कमी होत आहे.

खूशखबर : उन्हाळी हंगामातही आता गव्हाची शेती शक्य : गव्हाचा नवा वाण विकसित

लिक्विड नॅनो डीएपी सहकारी क्षेत्रातील खत कंपनी इफकोने (IFFCO) विकसित केला आहे. इफकोचे व्यवस्थापकीय संचालक यू. एस. अवस्थी आणि केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. अवस्थी यांनी हे माती आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे वर्णन केले आहे, तर मंत्री मनसुख मांडविया यांनी भारताला स्वावलंबी बनविण्याची ही मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी नॅनो डीएपीचे सोयीस्कर खत म्हणून वर्णन केले होते. ते म्हणाले होते की, ते किमतीत स्वस्त आणि शेतकर्‍यांसाठी वापरण्यास सोयीस्कर असल्याचे सिद्ध होईल. यामुळे सरकारच्या अनुदानातही मोठी बचत होण्यास मदत होणार आहे. नॅनो-डीएपीला द्रव युरिया देखील म्हणतात, जे पारंपारिक दाणेदार युरियापेक्षा बरेच वेगळे आहे. काही काळापूर्वीच्या घोषणेनुसार, हे इंडिया फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह (IFFCO) आणि कोरोमंडल इंटरनॅशनल यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले आहे.

इफकोचे व्यवस्थापकीय संचालक यूएस अवस्थी यांनी एका कृषी परिषदेदरम्यान सांगितले होते की, इफको नॅनो यूरिया आणि नॅनो डीएपी नंतर लवकरच इफको नॅनो-पोटाश, नॅनो-झिंक आणि नॅनो- कॉपर देखील लॉन्च करण्याची योजना आखत आहे. जून 2021 मध्ये, पारंपरिक युरियाला पर्याय म्हणून नॅनो-युरिया द्रव स्वरूपात लाँच करण्यात आला. नॅनो युरियाचे उत्पादन वाढविण्यासाठी उत्पादन प्रकल्पही उभारण्यात आले. आता नॅनो युरिया अनेक देशांमध्ये निर्यात होत आहे. अलीकडे, नॅनो युरियाचे नमुनेही अनेक देशांना पाठवण्यात आले आहेत, त्यापैकी ब्राझीलने इफको नॅनो युरिया द्रव खताला मान्यता दिली आहे.

मोठी बातमी : कांदा उत्पादकाच्या आडचणीत वाढ : दराची घसरण सुरूच

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here