दुधाच्या दराला हमीभाव देण्याच्या दुध उत्पादकांच्या मागणीचा विचार करून राज्य सरकारने दर निश्चितचे नवे धोरण आखले आहे. त्यानुसार आता दुधाचे खरेदी दर निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली असून, ही समिती प्रत्येक तीन महिन्याला दुग्ध व्यवसायाची वर्तमान स्थिती लक्षात घेवून दुधाचे दर निश्चित करणार आहे.
मोठी बातमी : राज्यातील 36 धरणे अद्यापही कोरडीच !
पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये सहकारी दूध संघ, खाजगी दूध संघ, पशुधाद्य उत्पादक कंपनी व पशुपालकाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती प्रत्येक तीन महिन्याला चालू स्थितीचा विचार करून दूध दर निश्चित करणार आहे.
राज्यात गेल्या काही दिवसात दुधाचे दर कमी झाले आहेत. सध्या दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. दुधाच्या दरात पाच ते आठ रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी आडचणीत आले आहेत. दुग्ध व्यवसाय हा शेतीचा मुख्य पूरक व्यवसाय आहे. मात्र गेल्या काही दिवसात पशुधाद्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने दुग्ध व्यवसाय आडचणीत आला. त्यामुळे दुधाला हमीभाव द्यावा, अशी मागणी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांमधून होत होती.
हेही वाचा : हळदीच्या वायद्यांमध्ये मोठी तेजी
दरम्यान पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार पशुसंवर्धन गुणवत्ता आणि दूध दर नियंत्रण करण्यासाठी ही राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
ही समिती दर तीन महिन्यांनी वर्तमान स्थिती लक्षात घेऊन दुधाचे खरेदी दर निश्चित करणार आहे. यामुळे सहकारी व खाजगी दूध संघाचा चालवण्याचा खर्च आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन हा निर्णय होणार आहे. यामुळे दरामध्ये समतोल राहील, अशी अपेक्षा आहे.
गुडन्यूज : राज्यात पुढीचे ५ दिवस मुसळधार ते अती मुसळधार ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇