जागतीक स्तरावरील कृषी तंत्रज्ञानाचा लाभ माण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी, माणेदेशी फाऊंडेशनच्या वतीने अमेरिकेतील रोबो तालुक्यात आणण्यात आला आहे. हा रोबो पिकाच्या आरोग्याची अचूक तपासणी करणार आहे. या रोबोच्या माध्यमातून पिकाची पाहणी करण्यात येणार असून, पिकावरील रोगांचा प्रादुर्भाव आणि त्या पिकांला आवश्यक असणाऱ्या खाताच्या मात्रा याची माहिती मिळणार आहे. म्हसवड तालुक्यात या रोबोचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना नुकतेच दाखविण्यात आले. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची माणिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी दिली.
हे नक्की वाचा : गुरुकुंज मोझरी येथे दहावे अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलन
मूळच्या पुण्यातील रहिवासी असलेल्या चिन्मय सोनम आणि अमोल गिजरे या दोघांनी सलग चार वर्षे अमेरिकेत संशोधन करून पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी पिकांची पाहणी करुन पिकांवर कोणकोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकाचा रंग, उंची आणि पीक वाढीस कोणकोणत्या अन्नद्रव्य, खतांची गरज आहे याचे अचूक विश्लेषण करणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यानंतर त्यांनी स्वयंचलित रोबोट तयार केला आहे. हा चारचाकी रोबो पिकात फिरून पिकाची पाहणी करतो.
या रोबोटमध्ये ठिकठिकाणी स्वयंचलित कॅमेरे असून, कॅमेऱ्यांच्या साह्याने पिकाचे चित्रण करून पिकाची उंची, रंग, जाडी याच्यासह पिकावर कोणत्या कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे किंवा रोग्याची शक्यता आहे याची माहिती रोबोटमधील सॉफ्टवेअरला देतो. या माहितीचे अचूकरीत्या विश्लेषण करून हा रोबोट पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अशी आगाऊ माहिती देतो. या रोबोटला अमेरिकेतील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर या दोघांनी मिळून रोबोट निर्मितीसाठी अर्थसेन्स नावाची कंपनी अमेरिकेत स्थापन केली आहे. या दोघांनी मिळून आतापर्यंत अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये 120 रोबोट विकले आहेत. एक रोबोटची किंमत सुमारे 50 लाख आहे.
टिप्स : डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन
या रोबोचे म्हसवडजवळच्या ढोकमोढा येथील शेतात डाळिंब, मका, ज्वारी आदी पिकांच्या पाहणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. डाळिंब, मका, ज्वारी आणि बाजरी या चार पिकांसाठी सॉफ्टवेअर बनवले आहे. अमेरिकेतील रोबोच्या माध्यामातून शेतकऱ्यांना पिकावर झालेल्या रोगाची माहिती मिळणार आहे. तसेच पिकांना आवश्यक असणाऱ्या खतांची माहिती देखील मिळणार आहे.
ब्रेकिंग न्यूज : हवामानातील बदलामुळे रब्बी पिके धोक्यात
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1