माती परीक्षणाला लागणारा वेळ, खर्च आणि गुंतागुत यामुळे माती परीक्षणाविषयी शेतकर्यांमध्ये खर्या अर्थाने अनास्था आहे. ही शेतकऱ्यांची अनस्था दूर करून त्यांना केवळ 90 सेकंदात स्वत:च्याच मोबाईलवर अचूक माती परिक्षण करता यावे; असे एक पोर्टेबल किट कानपूर येथील एका आयआयटी कंपनीने बनविले आहे. त्यामुळे आता सर्वांना आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले ठेवणे सोयीचे जाणार आहे.
पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी पहिले जमिनीचे आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे असते त्यामुळे जमिनीच्या मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षण करण्यासाठी पहिल्यांदा जमिनीतील १ किलो माती घेऊन परीक्षण लॅब ला घेऊन जावे लागते नंतर रिपोर्ट हा लगेच न भेटत काही दिवस रिपोर्ट येण्यास लागतात. मात्र कानपुर मधील एका आयआयटी संस्थेने मातीचे परीक्षण वेगाने तसेच अचूक करण्यासाठी एक पोर्टेबल किट तयार केले आहे. जमिनीतील एका किलो च्या माती ची गरज न भासता फक्त ५ ग्रॅम माती घेऊन तुम्ही मोबाईलच्या मदतीने ९० सेकंदाच्या मातीचे आरोग्य जाणून घेणार आहात.
वेळीची बचत अन् अचूक परीक्षण : काळाच्या बदलानुसार शेतकरी सुद्धा आता माती परिक्षणावर भर देत आहेत. त्यासाठी जमिनीतील एक किलो माती घेऊन परीक्षण लॅब ला जावे लागते. त्यामध्ये अपेक्षित आणि अचूक नित्कर्ष काढण्यासाठी सुमारे ५-७ दिवस लागतात. त्या शिवाय वाहतुकीचा खर्च आणि वेळ सुद्धा वाया जायचा त्यामुळे काही शेतकरी माती परीक्षण करण्यास टाळायचे. परंतु ही समस्या दूर करण्यासाठी आयआयटी कानपुर मधील रसायन अभियांत्रिकी विभागातील जयंत कुमार सिंग, पल्लव प्रिन्स, अशर अहमद, यशस्वी खेमानी व महम्मद आमीर खान यांनी एक उपरकण बनवले आहे.
असे होते परीक्षण : मातीचे परीक्षण झालेला निकाल लवकर प्राप्त व्हावा, म्हणून त्यांनी ‘भू परीक्षक’ हे मोबाईल ॲप तयार केले आहे. ५ ग्रॅम माती तुम्ही ५ सेमी लांबीच्या उपकरणांमध्ये टाकायचा आणि हे उपकरण ब्लुटूथद्वारे मोबाईलशी जोडावे त्यानंतर ही प्रक्रिया ९० सेकंद चालते. यानंतर मोबाईलच्या ॲपमध्ये मातीचा योग्य तो अहवाल दिसतो.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
राज्यात नर्सरी हब सुरू करणार : कृषीमंत्र दादाजी भुसे
शेतकऱ्यांनाही मिळणार आता पेन्शन
हवामान बदलामुळे राज्यातील 2 लाख हेक्टर फळबागा धोक्यात
बारामतीत चक्क मिरचीसाठी होमिओपॅथी औषधाचा वापर
सातबारा उतारा होणार बंद; मिळणार प्रॉपर्टी कार्ड
सहा घटकांचे परीक्षण : आयआयटी कानपुर च्या संस्थेत जे तयार केलेले उपकरण आहे, त्या उपकरणामुळे माती मधील नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय कर्ब सोबत सहा घटकांचे प्रमाण समजते. पिकाचा उल्लेख केला तर पिकासाठी लागणारी खताची मात्रा तसेच परीक्षण केल्यानंतर शेतीसाठी जी शिफारस सुचविले जाते त्यानंतर आपण केले तर पिकाचे उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे आणि चांगल्या दर्जाचे होते. अजून हे ॲप बाजारात आले नाही मात्र हे ॲप परीक्षण करण्यासाठी यशस्वी ठरले आहे त्यामुळे लवकरच सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे ॲप वापरता येणार आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा.