शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यातून आता राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.
ब्रेकिंग : सोमवारीपासून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत : कृषीमंत्री सत्तार
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्या टप्प्याने रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.
यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वर्षाला या योजनेद्वारे सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, ते कशा पद्धतीने देणार याबाबत आणखी माहिती मिळालेली नाही. लवकरच याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी किती रुपयांची तरतूद करण्यात येणार याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, सरकार लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील, याबाबत देखील अद्याप काही माहिती मिळालेली नाही.
महा ब्रेकिंग न्यूज : अखेर ठरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त
दरम्यान, आगामी काळात महानगर पालिकांच्या निवडणुका येत आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी मतदार आपल्याकडे वळवण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 3,501 कोटी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1