शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा शाश्वत मार्ग दाखविणार्या शेतीपूरक उद्योगातही आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे क्रांती घडत आहे. थोड्याच दिवसापूर्वी टेस्टट्यूब शेळीचा प्रयोग यशस्वी झाला होता आता या तंत्रज्ञानाचा उपयोग पशुपालन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असून, त्यामाध्यमातून पशुपालकांची आर्थिक उन्नती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचाच भाग म्हणजे आता टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाच्या आधारे नैसर्गिक रित्या कालवडींना जन्म देणे सहज शक्य होणार आहे.

याबाबत नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील डॉ. एस. के. सहातपुरे यांनी यशस्वी संशोधन केले असून त्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आतापर्यंत जवळजवळ साठ गाईंच्या गर्भामध्ये गर्भ प्रत्यारोपण करण्यात आले असून आतापर्यंत 15 गाईंना टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाच्या आधारे गर्भधारणा झाली आहे.
त्यापैकी दोन गाईनी कालवाडीना जन्म दिल्याची माहिती डॉ. सहातपुरे यांनी दिली. यापैकी 2 कालवडींचा जन्म नुकताच नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात नैसर्गिक रित्या झाला असून, त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. जैव तंत्रज्ञानात उच्च दुग्ध उत्पादनाची क्षमता असणाऱ्या वर्गीकृत देशी गाय म्हणजेच दाता गाईच्या गर्भाशयाच्या बीजांडवरील बिजा कोषातून स्त्री बीज अल्ट्रा सोनोग्राफीच्या मदतीने एका नलिकेत शोषून घेतले जाते व भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेत या स्त्री बीजाचे नि:खलन आणि पुरुष बीजाशी फलितीकरण प्रक्रिया करून निर्माण झालेला भ्रूण 8 दिवस प्रयोगशाळेत एका विशिष्ट वातावरणात वाढवून आठ दिवसांचा भ्रूण प्रत्यारोपणासाठी तयार करण्यात येतो.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
जागतीक स्थरावर का चर्चेत आहे, भारतीय गीर गाय ?
खिल्लार या गोवंशाला का म्हणतात पांढरे सोने ?
यामध्ये गर्भधारणेचा निश्चित कालावधी पूर्ण झाल्यानंतर कमी उत्पादन क्षमता असलेली अवर्गीकृत गाय उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या वर्गीकृत जातीच्या गायीच्या वासराला नैसर्गिकरित्या जन्म देते. व असे जन्मलेले वासरू वयात येऊन नैसर्गिक गर्भधारणेनंतर 20 ते 25 लिटर दूध उत्पादन देऊ शकते.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇