राज्यातील रेशन दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी भाजीपाला आणि फळे विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांना रेशन दुकानामध्ये भाजीपाला आणि फळे विक्री करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कंपन्यांच्या शेतकरी सभासदांनी पिकवलेला भाजीपाला आणि फळे या कंपन्या विकू शकतील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
लक्षवेधी बातमी : शेतकरी अपघात विमा योजना नव्या रूपात शक्य
पुणे जिल्ह्यातील शाश्वत कृषी विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनी आणि फार्म फिस्ट शेतकरी उत्पादक लिमिटेड नाशिक या दोन कंपन्यांना पुणे, मुंबई-ठाणे क्षेत्रातील रेशन दुकानांमधून भाजीपाला आणि फळे विकण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ब्रेकिंग न्यूज : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळ्याचा समावेश
पुढील सहा महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर ही परवानगी दिली आहे. या दोन्ही कंपन्यांना भाजीपाला आणि फळे या व्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकारचा माल किंवा वस्तू रेशन दुकानातून विकता येणार नाही. तसेच हा व्यवहार करताना संबंधित कंपनी आणि घाऊक किंवा किरकोळ विक्रेते आणि रास्त भाव दुकानदार यांच्यात राहील. त्यात शासन हस्तक्षेप करणार नाही, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

मान्सून अपडेट : मान्सूनचे आगमनाचा मुहूर्त लांबला : उष्णतेची लाट कायम

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1