यंदाचा उन्हाळा सर्वांनाच कासावीस करणारा ठरला आहे. उन्हाचा पारा सातत्याने 44 ते 45 अंशाच्या आसपास राहिला आहे. सध्या राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार होत असून, पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. विदर्भात उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे. आज (ता. १९) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा कायम असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान आज यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, महागाव तालुक्याला पावसाने झोडपले आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तेथे उष्णतेची लाट होती. तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.८ अंशांची वाढ झाल्याने नगर येथेही उष्ण लाट होती. तर चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, ब्रह्मपुरी येथे कमाल तापमान ४४ अंशांच्या पुढे होत उर्वरित राज्यात तापमान ३० ते ४३ अंशांच्या आसपास होते.
आनंदाची बातमी : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यास हिरवा कंदील
अरबी समुद्रात केरळ आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आता उत्तर तमिळनाडू आणि परिसरावर आहे. यातच मध्य प्रदेशपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मान्सून अपडेट : नक्की मान्सून वेळेआधी येणार का ?
बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.१, नगर ४३.४, धुळे ४२.६, कोल्हापूर ३५.४, महाबळेश्वर ३०.८, मालेगाव ४३.६, नाशिक ३६.९, निफाड ३७.७, सांगली ३७.८, सातारा ३८.१, सोलापूर ४०.७, सांताक्रूझ ३४.५, डहाणू ३४.८, रत्नागिरी ३३.४, औरंगाबाद ४१.०, परभणी ४२.७, नांदेड ४१.८, अकोला ४४.४, अमरावती ४४.६, बुलडाणा ४१.८, ब्रह्मपुरी ४४.३, चंद्रपूर ४४.६, गोंदिया ४३.०, नागपूर ४३.४, वर्धा ४५.०, यवतमाळ ४४.५.
ब्रेकिंग न्यूज : उजनीच्या पाण्यावरून वातावरण पेटणार ?
विदर्भातील अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मान्सून 27 मे रोजी तो केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. आता आहे तशीच स्थिती अनुकूल राहिल्यास मान्सून 6 जूनला मुंबईत तर 11 जूनला मराठवाड्यात पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच, 11 जूनपर्यंत मान्सून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी खंड पडल्यानं 10 जुलैपर्यंत या भागांत मान्सूनची प्रतीक्षा करावी लागली होती. त्या तुलनेत यंदा महिनाभर आधीच वरुणराजाचं आगमन होण्याचे संकेत आहेत.
हे वाचा : अकोल्यात ‘ट्रॅक्टर आमचे-डिझेल तुमचे’ योजना सुरू

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1