पीएम किसानच्या 11 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार 2 दिवसांनी म्हणजेच 31 मे रोजी देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करणार आहे. विशेष म्हणजे केवायसी अपडेट करण्याची संधी अजून दोन दिवस आहे. त्यानंतर केंद्र सरकार 21 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या 11 व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित करणार आहे.
महत्त्वाची बातमी : येवला येथे 15 जून रोजी होणार कांदा परिषद
31 मे रोजी पंतप्रधान नरेन्द्र मोदी शिमला येथे राष्ट्रीय स्तरावरील गरीब कल्याण संमेलनात सहभागी होणार आहेत. त्यावेळी ते 9 केंद्रीय मंत्रालये आणि कार्यक्रमात सहभागी असलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानच्या 11 व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित केले जातील.

नक्की वाचा : मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचा किसान सभेचा इशारा
ज्या शेतकऱ्यांनी केवायसी अजून अपडेट केले नसेल, तर केवायसी अपडेट करण्याची संधी अजून दोन दिवस आहे. अन्यथा त्यांच्या खात्यात 11 व्या हप्त्याचे पैसे येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. केवायसी अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे 31 मे पर्यंत संधी आहे.
मान्सून अपडेट : पुढच्या 72 तासांत मान्सून केरळमध्ये
यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले होते. देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता वर्ग करण्यात आला. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. हा 11 व हप्ता 31 मे रोजी जमा होणार आहे.
महत्त्वाची बातमी : नांदेडमध्ये बोगस बियाणे कंपनीवर छापा

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1