गेल्या चार ते पाच दिवसापुर्वी मान्सूनने अंदमानात प्रवेश केला आहे. त्यानंतर मान्सून केरळातही दाखल झाला. आता महाराष्ट्रात लवकरच मान्सूनच्या सरी बरसणार या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची आशामोड करणारी बातमी समोर आली आहे. कारण मान्सूनने आरबी समुद्रात विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाचा निणर्य : अखेर बांबू कोळशावरील निर्यात बंदी उठवली
मान्सून केरळातही दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात पावसाचे आगमन कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले होते मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी मान्सूनचा पाऊस अरबी समुद्रात अवतरला असला तरी राज्यात अजून पसरला नसल्याचे चित्र आहे. कारण मान्सून, अरबी समुद्रात दाखल झाला असला तरीही तिथेच त्याने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात पाऊस पडण्याचा कालावधी लांबणीवर पडला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
नक्की वाचा : देशात ‘मधुर क्रांती’ घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील : कृषीमंत्री तोमर
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवस झाली मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पावसाने झोडपून काढले आहे. पहिल्यांदा पाऊस अरबी समुद्रात दाखल झाला. तेथुन काही ठिकाणी पाऊस कोसळला पण पुन्हा त्याने विश्रांती घेतली असल्याचे समोर आले आहे. मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे आता त्याचे आगमन 2 दिवसांनी लांबणीवर गेले आहे. आगामी 2 ते 3 दिवसात मान्सून केरळात दाखल होईल. त्यानंतर 5 जूनला कोकणात आणि 7 जूनला मुंबईत दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
मोठी बातमी : केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात
दरम्यान, याअगोदर मान्सून मुंबईत 5 जूनला दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सध्या त्यासाठी परिस्थिती पूरक नसल्याचे दिसत आहे. 10 ते 16 जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे. तसेच, आगामी 2 ते 3 दिवसात मान्सून केरळात दाखल होणार आहे. त्यानंतर राज्यात 3 ते 9 जूनमध्ये तो राज्यात धडकणार आहे.
आनंदाची बातमी : शेतकऱ्यांना मोफत मिळणार भाज्या, कडधान्यांचे 10 वाण
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1