शेतकऱ्यांना पंतप्रधान किसन सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणारा २००० रुपयांचा ८ वा हप्ता लवकरच आपल्या बँकेतील खात्यामध्ये जमा होणार आहे. हा दुसरा हप्ता सर्वसाधारण १ ते १५ एप्रिलच्या दरम्यान जमा होणार असून, येत्या २८ मार्चपासून त्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
या योजने अंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांना २००० रुपयांचे सात हप्ते मिळाले आहेत. मात्र आठव्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाचे पैसे शेतकऱ्यांना परत करावे लागणार आहेत. यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
यापूर्वीचा ७ वा हप्ता २५ डिसेंबर २०२० रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्यावेळी ही योजना केवळ २ हेक्टर शेती करणार्या शेतकऱ्यांसाठीच होती. मात्र हीच योजना नंतर देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी देशातील ११.६६ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.

आपले नाव कसे तपासणार ?
जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळविण्यासाठी नोंदणी केली असेल आणि तुम्हाला तुमची माहिती मिळवायची असेल तर सर्व प्रथम, आपल्याला या योजनेशी संबंधित अधिकृत साइटवर जावे लागेल. ज्यामध्ये शेतकरी कॉर्नरचा पर्याय दिसेल, शेतकरी नोंदणी टॅबवर क्लिक करा. https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर लॉगिन करा, भारताचा नकाशा, पेमेंट सक्सेस टॅबच्या खाली दिसेल. भारताचा नकाशा येईल, येथे डॅशबोर्ड लिहिले असेल, त्यावर क्लिक करा, एक नवीन पृष्ठ क्लिक होताच ते उघडेल. त्यानंतर आपण गावाची संपूर्ण माहिती घेऊ शकता.
प्रथम राज्य निवडा, नंतर आपला जिल्हा, नंतर तहसील आणि नंतर आपले गाव, शो बटनावर क्लिक करा, त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल. यासाठी आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ डिसेंबर २०१९ पासून आधार क्रमांक देखील आवश्यक झाला आहे. तरच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
दरम्यान, घटनात्मक पदावर असणाऱ्या शेतकर्यांनाही आता या योजनेचा लाभ मिऴणार नाही. जे शेतकरी राजकारणात घटनात्मक म्हणजेच जिल्हा पंचायत सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार ते आजी-माजी आमदार या पदावर आहेत, आशाना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात काम करणा-या अधिकारी, कर्मचा-यालाही याचा लाभ मिऴणार नाही.