राज्यात आजपासून पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

डख यांच्या मते दि. 28 ते 30 एप्रिल दरम्यान 2023 पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट होणार आहे. या कालावधीमध्ये सोसाट्याचा वारा देखील वाहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच सामान्य जनतेला अधिक सतर्क राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
डख यांच्या अंदाजानुसार आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील लातूर, सोलापूर, बीड, नांदेड, परभणी, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच या जिल्ह्यातील काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.

या काळात उर्वरित राज्यात देखील पावसाची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यात मात्र रिमझिम पाऊस पडणार असून सर्वदूर पाऊस पडणार नाही अस त्यांनी सांगितले आहे. दि. 29 आणि 30 एप्रिल रोजी राज्यातील सांगली, सातारा तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
आपणास ही बातमीआवडली असल्यास खालील स्टार क्लिक करुन रेटींग करा !