कांदा उत्पादनातील घट, अतिवृष्टीने कांदा सडल्यामुळे होणारे नुकसान व परकीय देशातील मोठी मागणी या कारणामुळे यापूर्वी कांद्याला भाव मिळाले. मात्र, चांगले भाव मिळताच निर्यात बंदी, निर्यात शुल्क वाढ, व्यापारी वर्गाला साठवणुकीचे बंधन, आयकराच्या धाडी असे विरोधी हत्यार उपसले जाते. यावर काही तरी ठोस मार्ग काढण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने येवला येथे १५ जून रोजी ‘कांदा उत्पादक व व्यापार परिषद’ घेण्याची घोषणा करण्यात आली.
नक्की वाचा : मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचा किसान सभेचा इशारा

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे संघटनेची बैठक पार पडली. या नियोजित कांदा परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शेतकरी नेते संतू पाटील झांबरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या परिषदेत शेतीप्रश्नाचे अभ्यासक, अभ्यासू नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी केले.
मान्सून अपडेट : पुढच्या 72 तासांत मान्सून केरळमध्ये
कांदा परिषद यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी संघटनेचे नेते कार्यकर्ते प्रयत्न करणार असल्याचे बापूसाहेब पगारे, नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, जाफरभाई पठाण, शिवाजी वाघ यांनी सांगितले. बैठकीला शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख शशिकांत भदाणे, सुरेश जेजूरकर, योगेश सोमवंशी, आनंदा महाले, सांडुभाई शेख, राजाभाऊ जाधव, भाऊलाल बेंडके, भानुदास चव्हाण, उद्धव हागोटे, प्रवीण गायकवाड यांसह शेतकरी उपस्थित होते.
महत्त्वाची बातमी : नांदेडमध्ये बोगस बियाणे कंपनीवर छापा

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1