कांदा दरातील घसरणीमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आडचणीत सापडले आहेत. एकीकडे उत्पादन खर्च वाढला आहे. तर दुसरीकडे दरात घट होत चालली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर शासनस्तरावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे लासलगाव बाजार समितीच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागाला निवेदन देऊन कळविण्यात आले आहे.
चिंताजनक : लातूर विभगात हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव
कांदा हे व्यापारिदृष्टया सर्वात महत्वाचे भाजीपाला पीक आहे. कांदा पिकविणाऱ्या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 1.00 लाख हेक्टरवर कांद्याची लागवड होते. महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हे जिल्हे कांदा पिकविण्यात नंबर एक आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्दा काही जिल्हयांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. तसेच गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिध्द आहे. कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी महाराट्रातील 37 टक्के तर भारतातील 10 टक्के कांद्याचे उत्पादन एकटया नाशिक जिल्हयात घेतले जाते.
मात्र यंदा कांद्यला दर नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजार भावात 480 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी चिंताग्रस्त असून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विचारात आहेत. कांद्याचे जास्तीजास्त बाजार भाव एक हजार रुपयांच्या आत आल्याने उत्पादन खर्च तर दूर वाहतूक आणि मजुरी निघत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
खूशखबर : पीएम किसानचा 13 वा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार !
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचे महागडे बियाणे आणि रोपे त्याच्यासोबत कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई अशा अनेक बाबींचा सामना कराव लागत आहे. महागडी औषधे, खतांचे दरही वाढलेली असताना, लाल कांद्यांना दोन हजार रुपये क्विंटलचा दर मिळणे अपेक्षित होते. मात्र लाल कांद्याचे आवक सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. लाल कांदा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे. अशा नेहमीच्याच नुकसानीमुळे काही कांदा उत्पादक शेतकरी कांदा लागवड सोडून देण्याच्या विचारात आहेत.
कांद्याच्या दरा संदर्भात राज्य शासनाने ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघेल याची तरी हमी द्यावी. नाहीतर कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. दरम्यान,
कांदा दराच्या घसरणीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणेसाठी शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागाला निवेदन देऊन कळविण्यात आले आहे.
धक्कादायक : अमेरिकेने वर्तविला भारतीय मान्सूनबाबत हा अंदाज
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1