Onion Market : कांदा उत्पादक आक्रमक : कांदा लिलाव बंद

0
267

Onion Auction Closed : कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 2 लाख टन कांदा प्रति क्विंटल 2410 रूपये दराने खरेदी करण्याची घोषणा केली. मात्र नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये (Market Committees) कांदा खरेदीसाठी नाफेड किंवा एनसीसीएफचे प्रतिनिधी न आल्याने आज कांद्याच्या सरासरी दरात घसरण (Onion Prices Fall) झाली. त्यामुळे कांदा उत्पादक आक्रमक (Onion Grower Aggressive) झाले. त्यांनी कांदा लिलाव (Onion Auction) बंद पडले.

नक्की वाचा : शेती कर्जासाठी आरबीआय पायलट प्रोजेक्ट सुरू

चालू वर्षी उन्हाळी कांद्याला दर नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत होते. अशातच ऑगस्ट महिन्यात दरात सुधारणा होताच केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क तात्काळ लागू केले. त्यामुळे निर्यात प्रक्रिया अडचणीत सापडल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव बंदची (Onion Auction Closed) हाक दिली. दरम्यान कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मात्र केंद्र सरकारने 2,410 रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे 2 लाख क्विंटल कांदा खरेदी करण्याची घोषणा केली.

दरम्यान, काल केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यापाऱ्यांसह शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला जाणार असल्याचे आश्वासन दिल्याने, आज पुन्हा नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव (Onion Auction) सुरु झाले. मात्र आज पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी कांद्याचे लिलाव बंद (Onion Auction Closed) पाडले आहेत. चांगल्या दर्जाच्या कांद्याला 1 हजार 500 ते 2000 रुपयांचा दर दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

मोठी बातमी : कृषिमंत्र्यांनी दिल्या कृषी विद्यापीठांना या सक्त सूचना

दरम्यान, चांदवड (Chandwad) कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील आज संतप्त कांदा उत्पादक (Onion Grower) शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जाईल असे सरकारकडून सांगण्यात आले मात्र, कांदा खरेदीसाठी नाफेड (NAFED) किव्हा एनसीसीएफचे (NCCF) प्रतिनिधी आले नाहीत. लिलाव सुरु होताच कांद्याला 1 हजार 800 ते 2000 रुपयांचा भाव पुकारल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे आता नाफेडने बाजार समितीत येऊन कांद्याला 2 हजार 400 रुपयांचा दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

दरम्यान आज नांदगाव (Nandgaon) आणि मनमाड (Manmad) कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरु झाले. या दोन्ही बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी 1 हजार 800 ते 2 हजार 200 रुपयापर्यंतचा दर मिळाला आहे. लासलगाव (Lasalgaon) बाजार समितीत कांद्याचे लिलाव (Onion Auction) सुरु झाले आहेच. मात्र, पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon basvant) बाजार समितीत कांद्याचे लिलाव संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बंद पाडले आहेत.

ब्रेकिंग : केंद्राच्या धोरणावर कांदा उत्पादक संतापले

याबाबत बोलताना कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे (Onion Producers Association) अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक, रितेश चौव्हाण यांनी सर्व बाजार समित्यांमध्ये नाफेडची कांदा खरेदी 2,410 रुपये क्विंटल दराने होईल असा शब्द दिला. मात्र जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये नाफेडच्या कांदा खरेदीसाठी (Onion Purchase) खरेदीदार उतरले नाहीत. व्यापाऱ्यांनी लिलावात कांदा 1500 ते 1700 रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्यास सुरुवात केल्यानंतर शेतकऱ्यांनी बंद पडले असल्याचे सांगितले.

मोठी बातमी : केंद्राचा कांदा निर्यातीवर अप्रत्यक्ष निर्बंध : निर्यातशुल्कात 40 टक्के वाढ

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here