गेल्या पाच महिन्यांपासून दरात सुरु असलेली घसरण आजही कायम आहे. बाजारपेठेतील घटती मागणी आणि वाढते उत्पादन ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसाधारण गेल्या 5 महिन्यांपासून कांद्याला 15 रुपये किलोपेक्षा जास्त भाव मिळालेला नाही. सध्या कांद्याचा भाव एवढा कमी झाला आहे की, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. असे असले तरी उद्या दत वाढतील या आशेवर सध्या राज्यभर कांदा लागवड आणि पेरणीही जोरात सुरु आहे.
मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी किसान सभा होणार आक्रमक
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्यांवर केवळ 6 ते 14 रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही हाच दर मिळत आहे. मध्यंतरी नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता. मात्र, आता हाच कांदा पु्न्हा बाजारात दाखल होत असल्याने दर घसरण्याचा धोका अजून वाढला आहे. नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केली आहे पुढील महिन्यापासून देशातील मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नाफेडणे खरेदी केलेला कांद्याचा दिसून येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कांद्याचे दर पुन्हा घसरण्याची शक्यता निर्माण होणार आहे.
पुढे चांगला दर मिळेल या अपेक्षेने अनेक कांदा उत्पादक शेतकर्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे. सध्या सर्वत्र बाजारात विक्रीसाठी येणारा उन्हाळी कांदा हा मार्च आणि एप्रिल महिन्यामधील चाळीत साठवून ठेवलाच आहे. मध्यंतरीच्या संततधार पावसामुळे चाळीतील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इतके दिवस कांदा साठवूनही अपेक्षित दर मिळत नसल्याने केंद्र व राज्य सरकारने कांद्याला किलोला 10 रुपये अनुदान तसेच निर्यातील प्रोत्साहन देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकर्यांकडून जोर धरू लागली आहे.
ब्रेकिंग : सुधारित आदेश : अतिवृष्टीच्या मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार ?
कांद्याला दर मिळत नसल्याने लागवड क्षेत्र घटते की काय असे वाटत असताना मात्र लागवड वाढलेली आहे. यंदा खरीप हंगामात कांदा लागवड पावसामुळे महिन्याभराने लांबली आहे. काही भागात अधिकच्या पावसामुळे कांदा रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचा कांदा लावणीवर भर दिसून आला आहे. कांद्याचे दर एका रात्रीतून वाढतात. हा अनुभव असल्याने मोठ्या हिमतीने यंदा कांद्याची लागवड करण्यात आली आहे. यामुळे कांद्याचे क्षेत्र तर वाढले पण दराचे काय होणार हे मात्र आता पहावे लागणार आहे.
ब्रेकिंग न्यूज : जिल्हा बँका राज्य बँकेत विलीनीकरणाच्या हालचाली ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1