Onion: कांदा व्यापारी मागण्यांवर ठाम : लिलाव बंदच !

0
261

Onion trader : सरकारकडून कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्या (Onion trader demands) मान्य होईपर्यंत व्यापाऱ्यांचा कांदा लिलाव बंद (Onion auction closed) कायम राहणार आहे. कांदा व्यापारी असोसिएशनचे (Onion Traders Association) प्रवक्ते प्रवीण कदम (pravin kadam) यांनी ही भूमिका घेतली आहे. दरम्यान, कांदा व्यापारी असोसिएशन खासगी कांदा मार्केट सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही कदम यांनी सांगितले. 

मोठी बातमी : नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद !

नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनची काल बैठक झाली. त्यानंतर कदम बोलत होते. ते म्हणाले, नाफेडच्या (Nafed) माध्यमातून कांद्याची खरेदी करुन दर पाडण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. यामागे शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे सरकारचे षडयंत्र (Government conspiracy) आहे. मात्र खापर व्यापाऱ्यांच्या माथी फोडले जात आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर लिलाव सुरु करण्यास तयार असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले.

विंचूरमध्ये काही व्यापाऱ्यांवर दबाव टाकून कांदा लिलाव सुरू केल्याचा आरोप करून कदम म्हणाले, सरकार व्यापाऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. सरकार मागण्या (demands) मान्य करत नाही तोपर्यंत लिलाव सुरु होणार नाहीत. सरकारने नाफेडच्या (Nafed) माध्यमातून लिलाव सुरू करावेत. आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली. विंचूरचे 50 टक्के व्यापारी आमच्यासोबत आहेत. काहींवर दबाव टाकून बाजर सुरू केले जात आहेत. दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून राज्यभरात बंद पुकारला जाणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ब्रेकिंग : यंदा ऊस हंगाम वादात सापडण्याची चिन्हे

नाशिक जिल्हा (nashik Dristrict) व्यापारी असोसिएशनच्या (Onion Traders Association) काल झालेल्या बैठकीत बरीच मतमतांतरे झाली. अद्यापही नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची लिलाव बंद ठेवण्याची भूमिका कायम आहे. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली.

दरम्यान, व्यापाऱ्यांच्या बंदमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. आधीच कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे, त्यात व्यापाऱ्यांच्या लिलाव बंदीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, व्यापाऱ्यांच्या या भूमिकेनंतर आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : चांगला दर मिळेल तिथे आम्ही ऊस घालू : स्वाभिमानीची भूमिका

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here