सततच्या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परतीच्या पावसाने पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. असे असताना आता दिवाळीनंतर कांद्याचे दर वाढणार असल्याचे संकेत कांदा व्यापाऱ्यांकडून मिळत असून, दिवाळीनंतर कांदा 50 रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे वाचा : भाजीपाल्याचे भाव कडाडले !
सध्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 40 रुपये किलोच्या पुढे गेला असून, तो 50 रुपये किलोपर्यंत जाईल अशी शक्यता आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला किरकोळ बाजारात कांदा 15 ते 25 रुपये किलो होता. सध्या बाजारातील कांद्यचा पुरवठा शेतकऱ्यांकडून नसून व्यापाऱ्यांकडील जुन्या साठ्यातून होत आहे. हा व्यापाऱ्यांकडील कांद्याचा जुना साठा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच कांद्याचे भाव वाढत आहेत. किरकोळ बाजारात कांदा महागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कांद्याचे भाव वाढले आहेत. यामुळे वखारीत ठेवलेला कांदा शेतकरी बाहेर काढू लागले आहेत. पावसामुळे कांदा खराब होत आहे. गेल्या आठवड्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सुमारे 60-80 % वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ताजा कांदा बाजारात आला तरी किमतीतील तेजी कायम राहील, असे कांदा व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
आनंदाची बातमी : रब्बीच्या ‘या’ बियाण्यासाठी मिळणार अनुदान
मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. परंतु महाराष्ट्रातील कांदा इतर राज्यांच्या तुलनेत चांगला असल्याने या कांद्याला देशभरातून मागणी आहे. दसरा दिवाळी दरम्यान कांद्याची मागणी वाढते. महाराष्ट्रात आयात कांद्याची मागणी वाढणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कांद्याची किंमती वाढतील असे सांगितले जात आहे.
दरम्यान, पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला. यामुळे राहिलेल्या कांद्याला तरी चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. यामुळे आता दिवाळीनंतर तरी कांद्याला चांगला दर मिळणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मोठी बातमी : रब्बीच्या सहा पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1