आता आता टॉमेटोपाठोपाठ कांदाही भाव खाणार, अशी चिन्हे निर्माण झाली आहे. सध्या पावसाळ्यामुळे कांद्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा डिसेंबरपर्यंत देशात कांद्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसात कांद्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
मोठी बातमी : राज्यात जून महिन्यात केवळ 54 टक्के पाऊस
महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कांदा या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. गेल्यावर्षी रब्बी हंगामातील कांदा अवकाळी पावसामुळे खराब झाला होता. त्यामुळे जानेवारीपासून कांद्याचे दर पडले होते. खरीप हंगामातील लाल कांदा शेतकऱ्यांनी अतिशय कवडीमोल दरात विकवा लागला होता. मात्र आता जून महिन्यात भारत-बांगलादेश सीमा खुली झाल्याने कांदा बांगलादेशला निर्यात करणे सोपे झाले आहे. याचाही परिणाम कांदा दरवाढीत होताना दिसत आहे.

गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात कांद्याच्या किरकोळ किमतींत लक्षणीय वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही किंमत कमी असली तरी, सरकारी आकडेवारीनुसार, 2020 मध्ये भारतातील कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 35.88 रुपये होती, 2021 मध्ये हीच किंमत काहीशी घसरली आणि सरासरी किरकोळ किंमत 32.52 रुपये झाली. तर 2022 मध्ये ही किंमत 28.00 रुपये प्रति किलो होती. तसेच, यंदाच्या वर्षात म्हणजेच, 2023 मध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले आहेत. मात्र, येत्या काही महिन्यात कांदाही भाव खावू शकतो, अशी शक्यता आहे.
चिंताजनक : यंदा मान्सून कमी राहण्याची शक्यता ?
सरकारनं सुमारे दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांकडून सुमारे 0.14 दशलक्ष टन कांद्याचा साठा खरेदी केला आहे. केंद्र सरकार 2023-24 हंगामासाठी 3 लाख टन कांदे बफर स्टॉकमध्ये ठेवणार असल्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एप्रिलमध्ये सांगितले होते. तसेच, गेल्या हंगामात 2021-22 मध्ये 2.51 लाख टन कांदा बफर स्टॉकमध्ये ठेवण्यात आला होता. दुसरीकडे, 2022-23 मध्ये कांद्याचे उत्पादन 31.69 दशलक्ष टनांवरून 31.01 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज असल्याचा अहवाल भारत सरकारने जून महिन्याच्या सुरुवातीलाच दिला होता.
मोठी बातमी : राज्यातील 36 धरणे अद्यापही कोरडीच !

https://www.facebook.com/shetimitramagazine03