वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे मंगळवार, दि. 15 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत 15 दिवसाचे ऑनलाईन पद्धतीने राज्यस्तरीय सेंद्रिय शेती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
उद्या मंगळवारी साकाळी 7 वाजता या प्रशिक्षणाचे उद्घाटन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उद्घाटन प्रसंगी आनंद (गुजरात) येथील आनंद कृषी विद्यापीठ आणि गुजरात सेंद्रिय कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. बी. कथिरीया, पुणे येथील महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेचे अध्यक्ष तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. व्यंकट मायंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) दिलीप झेंडे, नागरपूर येथील प्रादेशिक जैविक शेती केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. अजय सिंह राजपूत, प्रगतिशील शेतकरी मेघा देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी बॉक्सवर क्यूआर कोड
लाल मिरचीचा ठसका दर 25 हजारावर
ई-पीक पहाणीसाठी शेवटचे दोन दिवस बाकी
नॅनो टेक्नॉलॉजीची कमाल सहा महिन्याचा ऊस 12 कांड्यावर
अकोला कृषी विद्यापीठाच्या चवळीच्या या वाणाला मिळाली मान्यता
या 15 दिवसात रविवार वगळून दररोज सायंकाळी सात ते साडेआठ या वेळेत ऑनलाईन झून मिटींग प्लॉटफार्मवरून (झूम आयडी 8810015203 पासवर्ड 12345) व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. थेट प्रक्षेपण विद्यापीठ यू-ट्यूब चॅनेल <https://www.youtube.com/user/vnmkv> यावर होणार असून यासाठी आजपर्यंत दोन हजार शेतकर्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी दिली.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आमचे इंस्टाग्राम पेजला फॉलोव्ह करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.instagram.com/shetimitra03/
शेतीमित्रचा online shetimitra टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा