अद्यापही राज्यात सर्वदूर आणि समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही भागात तर पावसाची सर्व नक्षत्रे अक्षरशा कोरडी गेली आहेत. अनेक भागात ऐनपावसाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एकूणच राज्यात जून महिन्यात 113.4 मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या केवळ 54 टक्के पाऊस झाला आहे.
चिंताजनक : यंदा मान्सून कमी राहण्याची शक्यता ?
एकूणच या वर्षी मान्सूनच्या पावसाला जोर कमी असून, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. जून महिन्यात मराठवाड्यात पावसाची दडी मारल्याने केवळ 31 टक्के पाऊस पडला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातही पावसाची तूट आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाने अक्षरशा दडी मारली आहे. त्यामुळे आता जुलै महिन्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

सर्वसाधारण जून महिन्यात राज्यात सरासरी 209.8 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा मान्सूनचे आगमन खुपच लांबले. यातच पूर्व मोसमी पावसाने दडी दिल्याने जून महिन्यात पावसाने अपेक्षित जोर धरला नाही. विशेष म्हणजे राज्याच्या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यातील 36 धरणे अद्यापही कोरडीच आहेत.
जूनच्या महिनाअखेरीस कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली. तर उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विदर्भासह राज्यातील काही भागात उष्ण लाट अनुभवायला मिळाली.
महा ब्रेकिंग : अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री
यंदा बिपॉरजॉय चक्रीवादळाचा मान्सूनवर मोठा परिणाम झाला. यंदा मान्सून 11 जून रोजी तळ कोकणात दाखल झाला. चक्रीवादळाची तीव्रता वाढत गेली आणि मान्सूनची वाटचाल थांबली. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यास 12 दिवस उशीर झाला. अखेर 23 जून रोजी विदर्भात मान्सूनने प्रवेश केला. तर 25 जून रोजी मान्सूनने विक्रमी मजल घेत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला.
25 जूननंतर अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला. विदर्भातही दमदार पाऊस झाला. मात्र उर्वरित राज्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली नाही.

जून अखेरपर्यंत विभागनिहाय स्थितीत विचार करता मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस झाला. मराठवाडा विभागाच्या पावसात 69 टक्के पावसाची तूट दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 51 टक्के तूट आहे. विदर्भ विभागात 49 टक्के तर कोकण-गोवा विभागाच्या पावसात 28 टक्क्यांची तूट असल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट होते.
मोठी बातमी : राज्यातील 36 धरणे अद्यापही कोरडीच !

https://www.facebook.com/shetimitramagazine03