खरिप हंगामातील केवळ सातच पिकांसाठी पंंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली असून, शेतकर्यांना त्यासाठी विमा प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 15 जुलैपर्यंत आहे.
अन्नधान्य व गळीतपिके तसेच नगदी पिकांसाठी विमा हप्त वेगवेगळा असून अन्नधान्य व गळीत धान्यासाठी 2 टक्के विमाहप्ता आहे तर नगदी पिकांसाठी 5 टक्के विमा हप्ता आहे. पेरणी केल्यापासून काढणी करण्यापर्यंत लागणार्या कालावधीत नैसर्गिक आग, गारपीट, वीज पडणे, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, चक्रीवादळ, रोग इत्यादी कारणांमुळे पिकांच्या उत्पादनात घट येत असल्यामुळे व्यापक विमा संरक्षण मिळणार आहे.

खरिप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी व बाजारी अशा सात पिकांसाठीच ही योजना असून, पीकविमा भरण्यासाठी विहित नमुना अर्ज, आधारकार्ड, सातबारा उतारा, पेरणी स्वयंघोषणापत्र, भाडेपट्टा करार संमतीपत्र किंवा शेतकर्यांचा करारनामा तसेच बँक पासबुक प्रत इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. विमा योजनत सहभागी होयचे असेल तर मुदत संपायच्या आधी विमाहप्त भरावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा