नागपूर येथे 25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘अॅग्रोव्हिजन’चे आयोजित करण्यात आले असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री नीतीन गडकरी यांनी केली. दाभा येथील पीडीकेव्ही ग्राऊंडवर सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन शेतकऱ्यांना पहाता आणि अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे या चार दिवसाच्या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी 30 पेक्षा जास्त विषयांवरील परिसंवाद व कार्यशाळा आणि कृषी उद्योग आधारित 2 परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शन काळात सुमारे 40 हून अधिक कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपस्थित शेतकर्यांना लाभणार असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले.
मोठा निर्णय : या निर्णयामुळे ऊसाच्या कट्यातील फसवणूक थांबणार ?
भविष्यातील शेती अन्न, चारा आणि इंधन संशोधनातून एकात्मक तंत्रज्ञानाचा विकास हे यंदाच्या अॅग्रोव्हिजनचे ब्रीद असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, यंदा हा आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा महामेळा आता नव्या जागेत, नव्या स्वरुपात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, अॅग्रोव्हिजन सुमारे 25 हजार स्न्वे मीटर डिस्प्ले जागेत होणार आहे. यामध्ये 400 पेक्षा जास्त संस्थांचा सहभाग असणार असून, एनएसआयसी, एमएसएमई, स्टार्टअप्ससाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. देशाच्या विविध भागातून येणार्या लाखो शेतकऱ्यांचा सहभाग या प्रदर्शनात असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून 13 वर्षापूर्वी अॅग्रोव्हिजनच्या आयोजनास सुरुवात झाली असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, अल्पावधीतच हे मध्य भारातातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन बनले आहे. कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे केंद्रस्थान ठरणार्या कार्यशाळा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरणाची दालने, कृषी विषयक ताज्या विषयावरील कार्यशाळा, विदर्भाच्या शेती उद्योगाला नवी दिशा देणार्या परिषदांसोबतच टेक्नॉलॉजी इनोव्हेशनसाठी तसेच एमएसएमईसाठी विशेष दालन ही या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये राहणार आहेत.
ब्रेकिंग न्यूज : आठ दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करा : कृषिमंत्री
अॅग्रोव्हिजन सुरूवातीपासून शेतकऱ्यांसाठी मोफत कार्यशाळांचे आयोजन करीत आले आहे. अॅग्रोव्हिजनचे प्रमुख आकर्षण असलेल्या कार्यशाळांमध्ये उत्पादन तंत्रज्ञान, नव्या शेतीपद्धती, जोडधंदे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, बाजार सुविधा, पशुधन व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांविषयी भर देण्यात येणार आहे. शेती सुकर व्हावी आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने कार्याशाळा आयोजित केल्या जातात. या वर्षी अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीने निवडलेल्या 30 पेक्षा जास्त विषयांवर कार्यशाळा होणार आहेत. देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि यशस्वी शेतकर्यांच्या यशोगाथांपासून प्रेरणा घेण्याची संधी यातून शेतकऱ्यांना मिळेणार आहे.

अॅग्रोव्हिजनमध्ये 30 पेक्षा जास्त विषयांवर कार्यशाळा
यंदा अॅग्रोव्हिजनमध्ये 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान स्वतंत्र तीन कक्षात दुपारी 11 ते सायंकाळी 6 यावेळेत 30 कार्यशाळा होणार असून, त्यामध्ये कृषी क्षेत्रात ड्रोनचा उपयोग, भाजीपाला बियाणे उत्पादन, जवस लागवड व मुल्यवर्धन, हायड्रोपोनिक्स व एरोपोनिक्स, लिंबूवर्गीय फळांचे निर्यातभिमुख उत्पादन, औषधी वनस्पतींमध्ये लागवड तंज्ञान व औषधी निर्मिती, नैसर्गिक आणि सेंद्रीय शेती, शहरी महिलांकरिता गच्चीवरील सेंद्रिय शेती, विदर्भात कृषी पर्याटनाच्या संधी, फलोत्पानात यांत्रिकीकरण, कापसून उत्पादनातील नवीन तंत्रज्ञान व कापसातील बायप्रोडॉक्टसचा वापर, हळद व आले लागवड व प्रक्रिया, कृषी वित्त व कृषी माल विपणन, मधमाशी पालन, मशरुम शेती, कुक्कुटपालनातून उत्पादनाच्या संधी, रेशीम शेती, रासायनांचा योग्य वापर, हवामान बदल व शेती, कार्बन क्रेडिट, व्हर्टीकल फार्मींग, ग्रीन हाऊस तंत्रज्ञान, फुलशेती, गोसेखूर्द प्रकल्प सादरीकरण, जलयुक्त शिवार, दुग्धव्यावसाय, ऊस उत्पादन या विषयांचा समावेश असणार आहे.
अॅग्रोव्हिजनमध्ये 2 परिषांचे आयोजन
यंदा अॅग्रोव्हिजनमध्ये कृषी उद्योग आधारित 2 परिषांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये विदर्भातील मत्स्यव्यवसायाच्या संधी व बांबू उत्पादनातून उत्पन्नाच्या संधी या दोन परिषांदा यंदा होणार आहेत. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मा बदलांचा पाया घालण्यासाठी या परिषदांचे आयोजन करण्यात आले असून, राज्यकर्ते, धोरणकर्ते, प्रयोगशील शेतकरी व या विषयासंबंधीत सर्वच जण यात सहभागी होणार आहेत.

विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली 13 वर्षापूर्वी अॅग्रोव्हिजनच्या आयोजनास सुरुवात झाली. अल्पावधीतच हे मध्य भारातातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन बनले आहे.
महत्त्वाची बातमी : भारतातून यंदा 11 देशात होणार भरड धान्याची निर्यात

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1