राज्यात ऊस उत्पादनात वाढ झाली असली अतिरिक्त उसाची गंभीर समस्या यंदा निर्माण झाली आहे. भविष्यात ती अधिकच भेडसावणार आहे. त्यामुळे आता वाढत्या ऊसाच्या क्षेत्राबाबत चिंत व्यक्त होताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वासर्वे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी ऊस हे आळशी शेतकऱ्यांचे पीक असल्याचे विधान केले होते. त्यांनी इतर पिकांचा पर्यायही यावेळी सांगितला होता. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या विधानावर नाराजीही व्यक्त केली होती. विशेषत: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना चिमटा घेत, आपल्या नातवाचे एकढे साखर कारखाने कसे ? असा खोचक सवालही विचारला होता. आता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सोलापूर येथील कार्याक्रमात अतिरिक्त ऊसाबाबात चितांजनक भाकीत केले आहे.

लक्षवेधी बातमी : खेड्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारचा 9 कलमी कार्यक्रम
सोलापूर जिल्ह्यात 60 हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरू असून, सोलापूर- विजयपूर, सोलापूर-सांगली आणि सोलापूर-अक्कलकोट अशा तीन राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे बटण दाबून आज करण्यात आले. त्याप्रसंगी त्यांनी हे चिंताजनक भाकीत केले आहे.
महत्त्वाची बातमी : बाजारात हिरव्या मिरचीचा ठसका तर लिंबाचा अंबटपणा वाढला !
याप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विजापूरचे खासदार रमेश जिगजिनी, आमदार सर्वश्री रणजितसिंह मोहिते-पाटील, बबनराव शिंदे, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते आदी उपस्थित होते.

आनंदाची बातमी : आता कृषी विभागात महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा ?
ते म्हणाले, ऊस हे शाश्वत पीक असले तरी शेतकर्यांनी इतर पिकांचाही आधार घेणे गरजेचे आहे. तसेच ऊसाच्या सायरपपासून इथेनॉल निर्मिती केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे आता पर्यायच उरलेला नाही. यंदा साखरेचे सर्वाधिक उत्पादन हे भारत देशामध्ये झाले आहे. देशांतर्गत दर कमी असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची मागणी असल्याने भारतामधील साखरेला अधिकची मागणी आहे. हे केवळ ब्राझिलचे उत्पादन घटल्यामुळे झाले आहे. त्यामुळे विक्रमी गाळपामुळे आ. बबनराव शिंदे यांच्या चेहऱ्यावर हसू असले तरी ते तात्पुरते आहे. ऊसाचे वाढलेले क्षेत्र हे धोक्याचेच राहणार आहे. असेच उत्पादन वाढत गेले तर ऊस उत्पादकांना देखील आत्महत्या करण्याची वेळ येईल असे त्यांनी यावेळी सुनावले.
नक्की वाचा : यंदा आंबाप्रेमींना मोजावे लागणार जास्त पैसे !
एकाच पिकाच्या मागे न जाता पीक पद्धतीमध्ये बदल करून उत्पादन वाढविता येत असल्याचे सांगून ते म्हणाले, देशात सर्वाधिक ऊसाचे गाळप करणारा साखर कारखाना म्हणून माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना ओळखला जातो. यंदाही या कारखान्यांचे 22 लाख टनाचे गाळप झाल्याचे आ. बबनदादा शिंदे यांनी मला सांगितले आहे. पण 22 लख टन ऊसाचे गाळप झाले असले तरी केवळ ब्राझिलचे साखर कारखाने सुरू नसल्यामुळे साखरेला दर अन्यथा 22 रुपयेही दर मिळाला नसता असे गडकरी म्हणाले.

लक्षवेधी बातमी : लोडशेडिंगबाबत ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा !
ऊसाचे गळप करून साखरेचे उत्पादन यावरच साखर कारखान्यांचा भर आहे. पण उसावर प्रक्रिया करून इथेनॉलची निर्मिती केली तर अधिकचा फायदा होणार आहे. जिल्ह्यातील साखर उत्पादकांनी आता साखरे ऐवजी इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. इथेनॉल निर्मितीतून वाहनांची वाहतू सुरू केली पाहिजे. अन्यथा साखर उद्योग चिंताग्रस्त होईल. बायो इथेनॉलवर फ्लेक्स इंजिन चालते. यावर चालणार्या गाड्या भारतात येणार असून आता पेट्रोलची गरज भासणार नाही. येणारा काळ ग्रीन हायड्रोजनचा असून को-जनरेशन याचे करा. दुषीत पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार केलातरच भविष्यात कारखाने टिकतील. त्यामुळे मागणीनुसार उत्पादनात बदल करण्याची ही चांगली संधी असून, प्रत्येक कारखान्यांने इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचा सल्ला गडकरी यांनी दिला. मात्र अतिरिक्त ऊसाची वेळ चिंता आहे. पुढच्या वर्षी यापेक्षा बिकट अवस्था असेल असेही भाकीत त्यांनी यावेळी वर्तविले.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1