अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर असलेल्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील 60 कारखान्यांपैकी 28 कारखान्यांनी आपला यंदाचा गाळप हंगाम थांबवला आहे. दरम्यान, 23 मे पर्यंत सर्व कारखान्यांनी रेकॉर्ड ब्रेक 3 कोटी 17 लाख 10 हजार 176 टन उसाचे गाळप केले आहे. तर 3 कोटी 16 लाख 97 हजार 990 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर मराठवाड्यातील 32 कारखान्यांचे गाळप अजूनही सुरूच आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखान्यांनी 70 लाख 21 हजार 949 टन उसाचे गाळप करत सरासरी 9.60 टक्के साखर उताऱ्याने 67 लाख 39 हजार 864 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील कारखान्यांनी 28 लाख 27 हजार 733 टन उसाचे गाळप करत सरासरी 10.45 टक्के साखर उताऱ्यांने 29 लाख 53 हजार 716 क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
महत्त्वाची बातमी : राज्यातील धरणांमध्ये 37 टक्के पाणीसाठा शिल्लक
तर जालना जिल्ह्यातील कारखान्यांनी 27 लाख 47 हजार 446 टन उसाचे गाळप करत 29 लाख 1 हजार 400 क्विंटल साखर उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 10.58 टक्के राहिला. बीड जिल्ह्यातील कारखान्यांनी 45 लाख 99 हजार 210 टन उसाचे गाळप करत सरासरी 8.71 टक्के साखर उताऱ्याने 40 लाख 6 हजार 790 क्विंटल साखर उत्पादन केले.

हे नक्की वाचा : पुण्यात होणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत
परभणी जिल्ह्यातील कारखान्यांनी 40 लाख 14 हजार 15 टन उसाचे गाळप करताना सरासरी 10.35 टक्के साखर उताऱ्याने 41 लाख 52 हजार 700 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हिंगोली जिल्ह्यातील कारखान्यांनी 21 लाख 43 हजार 228 टन उसाचे गाळप करत सरासरी 10.55 टक्के साखर उताऱ्याने 22 लाख 60 हजार 670 क्विंटल साखर उत्पादन केले.
मान्सून अपडेट : विदर्भात यलो अलर्ट : पुढचे दोन दिवस पाऊस !
नांदेड जिल्ह्यातील कारखान्यांनी 25 लाख 30 हजार 282 टन उसाचे गाळप करत 24 लाख 76 हजार 810 क्विंटल साखर उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 9.79 टक्के राहिला. लातूर जिल्ह्यातील कारखान्यांनी 58 लाख 26 हजार 313 टन उसाचे गाळप करत सरासरी 10.65 टक्के साखर उताऱ्याने ६२ लाख ६ हजार ४० क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.

आनंदाची बातमी : पुरंदर येथे मध पोळे चाचणी प्रयोगशाळा सुरु
यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभागी झालेल्या 60 कारखान्यांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील 14, औरंगाबाद जिल्ह्यातील 7, जालना जिल्ह्यातील 5, बीड जिल्ह्यातील 7, परभणी जिल्ह्यातील 6, हिंगोली जिल्ह्यातील 5, नांदेड जिल्ह्यातील 6 व लातूर जिल्ह्यातील 10 कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांपैकी उस्मानाबादमधील 10, औरंगाबाद व परभणीतील प्रत्येकी 2, जालन्यातील 1, हिंगोलीतील 4, नांदेडमधील 6 व लातूरमधील 3 असे मिळून 28 कारखान्यांनी आपला ऊस गाळप हंगाम थांबविला आहे.
हे वाचा : शेतकऱ्यांना टोमॅटोची लॉटरी : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1