State Agricultural Value Commission : शेतकरी नेते (farmer leader) पाशा पटेल (Pasha Patel) यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या (State Agricultural Value Commission) अध्यक्षपदी पुनश्च नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
MSP : रब्बीच्या या 6 पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ
पाशा पटेल यांच्या माध्यमातून स्व. गोपीनाथराव मुंडे (Gopinathrao Munde) यांच्या सच्च्या मित्राला कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे. पाशा पटेल हे यापूर्वीही राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. शेतीविषयक अभ्यासू नेतृत्व (scholarly leadership) व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्कृष्ट जाणकार व स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे खास सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात आणि पाशा पटेल यांच्यामध्ये कायमच गुरु -शिष्याचे नाते राहिलेले आहे. पाशा पटेल (Pasha Patel) यांच्याशी असलेल्या या नात्याबाबत धनंजय मुंडे यांनी नुकतेच औसा (जि. लातूर) येथे एका भाषणात बोलून दाखवले होते. दरम्यान आज या नियुक्तीच्या माध्यमातून आपण पाशा पटेल यांना गुरुदक्षिणा (Gurudakshina) दिली असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
ब्रेकिंग : कृषीमंत्री म्हणाले … तर मी देखील दिवाळी साजरी करणार नाही !
पाशा पटेल (Pasha Patel) यांचे कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान आहे. बांबू लागवड (Bamboo Plantation), बांबूवरील संशोधन तसेच बांबू पासून विविध वस्तू निर्मिती याबाबतचा औसा येथील त्यांचा प्रकल्प मॉडेल आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून पाशा पटेल पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा उमटवत शेतकऱ्यांच्या हितार्थ (Farmers Benefit) निर्णय घेतील, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
मोठी बातमी : 86032 उसाच्या वाणाला आता 15012 नवा पर्याय
https://www.facebook.com/shetimitramagazine03