आता शेतकरीही खूप स्मार्ट झाले आहेत. शेतकरी फक्त शेतीत वेगवेगळ्या तंत्रे वापरत नाही तर शेतीच्या विविध मार्गांवर प्रयोग करत आहेत. बाजारात मागणी असलेल्या फळाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यातूनच आता महाराष्ट्रात खजूराची लागवड वाढली आहे.
खजूर ही उपयुक्त वनस्पती असून, इतिहासपूर्व काळापासून सर्वाना माहित आहे. आशियातील ओसाड वाळवंटी प्रदेशात सेनेगालपासून सिंधू नदीपर्यंतच्या भागात खजूरचे उतपादन घेतले जाते. खजूर खाण्याव्यतिरिक्त याच्यापासून ज्यूस, जॅम, चटण्या, लोणचे आणि बेकरी उत्पादन सारख्या अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे बाजारात मागणी वाढत आहे. त्यामुळे आता राज्यांमध्ये खजुराची लागवड करून शेतकरी चांगला नफा कमवत असून, खजूराच्या शेतीतून पैसे कमावण्याची उत्तम संधी आहे.
भारतामध्ये राजस्थान व गुजरात राज्यात खजूर लागवड केली जाते. खजुराच्या नर आणि मादी अशा दोन प्रकारच्या प्रजाती आहेत. मादी प्रजातींमध्ये बरही, खुनेजी आणि हिल्लावी खजूर या तीन जाती आहेत. तर नर प्रजातींमध्ये धनमी आणि मादसरी या दोन जाती आहेत. खजूराचे बर्याच प्रजाती असून, प्रत्येक खरकेच्या लागवडीची पद्धत वेगळी आहे. तसेच जातीपरत्वे प्रत्येक झाडाच्या फळाला लागणारा वेळ देखील खजूराच्या प्रकारावर अवलंबून आहे. यामध्ये बरही, खुनेजी, हिल्लावी, जमाली, खदरावी इत्यादींचा समावेश आहे.
खजुराच्या लागवडीसाठी योग्य निचरा होणारी वालुकामय जमीन आवश्यक असते. कठीण जमिनीवर त्याची लागवड करता येत नाही. तसेच खजुराच्या लागवडीसाठी कोरडे हवामान गरजेचे असते. खजुराच्या वाढीसाठी जास्त पाणीही लागत नाही आणि खजुराची झाडे कडक सूर्यप्रकाशातही चांगले वाढते. एक एकर क्षेत्रात खजूराची सुमारे 70 झाडे बसतात. वाळवंटाच्या सभोवतालच्या प्रदेशात खजूराची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खजूराच्या सुरुवातीच्या वाढीसाठी सुमारे 30 अंश तपमान आवश्यक असते. तर खजुराचे फळे पिकण्यासाठी ४५ अंश तापमान लागते.
खजुराच्या लागवडीपूर्वी शेत तयार करणे आवश्यक असते. यासाठी सर्वप्रथम शेतातील माती कुळवाच्या सहाय्याने खोल नांगरणी करावी. त्यानंतर शेत उन्हात चांगले तापू द्यावे. त्यानंतर दोन ते तीन वेळा पुन्हा नांगरणी करून घ्यावी. असे केल्याने शेतातील माती चांगली भुसभुशीत होते.
खजुराच्या रोपांची लागवड करण्यासाठी शेतात एक मीटर अंतरावर खास खड्डे तयार करावेत. या खड्ड्यांमध्ये 25 ते 30 किलो चांगले कुजलेले शेण मातीसह टाकावे. बियाणे डोदोबण्यापुर्वी किव्हा रोप लावण्यापूर्वी एक महिना आधी हे खड्डे भरून तयार करावेत. खजुराची रोपे कोणत्याही सरकारी नोंदणीकृत रोपवाटिकेतून विकत घ्यावीत आणि तयार केलेल्या खड्ड्यात ही रोपे लावावीत. रोपे लावण्यासाठी ऑगस्ट महिना योग्य मानला जातो. खजुराच्या दोन झाडामधील अंतर जास्त ठेवावे लागते. एक एकर शेतात सुमारे 70 खजुराची रोपे लावता येतात. खजुराचे रोप लावणीनंतर 3 ते 5 वर्षांनी हे झाड उत्पादन देण्यास तयार होते.
खजुराच्या झाडांना खूप कमी पाणी लागते. लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांपर्यंत पाणी द्यावे लागते. उन्हाळ्याच्या हंगामात त्यांना 15 ते 20 दिवस पाणी द्यावे, तर हिवाळ्यात याच्या झाडांना महिन्यातून एकदाच पाणी द्यावे. खजूर लागवडीपासून उत्पादन मिळण्यासाठी कमीतकमी तीन ते पाच वर्षे लागतात. मात्र एकदा फलधारणा सुरु की उत्पन्न सुरु होते. पाच वर्षानंतर एका झाडावरून सरासरी 70 ते 100 किलो खजूर मिळतात.
खजुराच्या झाडांना फळे येण्यास सुरुवात झाली की पक्ष्यांच्या हल्ल्याचा धोका असतो. पक्षी झाडांवरील फळे चावून अधिक नुकसान करतात, ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. पक्ष्यांच्या हल्ल्यापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी झाडांवर जाळी टाकता येते.
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा